पुणे : फडणविसांच्या जादू टोण्यापुढे मेगा ओहोटी सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आपल्या कार्यकर्त्यांना ,पदाधिकाऱ्यांना आज शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी शपथ देण्याची वेळ आली . पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी युवा संवाद कार्यक्रमात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत ही शपथ अंकुश काकडे यांनी दिली .
काय दिली गेली शपथ?
‘मी आज शपथ घेतो, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री. शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे.
गेली 55 वर्षे राजकारणात आपला ज्यांनी वेगळा ठसा निर्माण केला.
अशा पवारसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे, हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन. माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. जयहिंद! जय महाराष्ट्र ! जय राष्ट्रवादी !