Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एनकॉर्डच्या ई-हेल्थ कार्डवर आता तुमचा वैद्यकीय तपशील डिजीटल पद्धतीने साठवा व सुरक्षित ठेवा

Date:

पुणेस्थित एनकॉर्ड ई-हेल्थ कार्डतर्फे येथील जवाहरलाल नेहरु कल्चरल हॉलमध्ये काल एका माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात एनकॉर्ड कंपनी व ई-हेल्थ कार्ड प्रणालीविषयी माहिती देण्यात आली. एनकॉर्ड ई-हेल्थ कार्ड आपला वैद्यकीय तपशील डिजीटल पद्धतीने साठवून सुरक्षित ठेवते व कधीही, कुठेही तो उपलब्ध करुन देते. यामुळे अधिक उत्तम निगा व वेळेवर आपत्कालीन उपचार असे फायदे होतात.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय लेखक व मार्गदर्शक डॉ. दीपक शिकारपूर आणि डिजीटल इंडियाचे ब्रँड म्बॅसेडर डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. या दोन्ही वक्त्यांनी आरोग्यसुरक्षा, तांत्रिक स्थिती, या दोन्हीचा संगम असलेले एनकॉर्डचे ई-हेल्थ कार्ड कसे काम करते, हे विशद केले.

 एनकॉर्डचे अध्यक्ष प्रकाश लोहारकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक निलेश कांदळगावकर यांनी संकेतस्थळाची माहिती दिली व ई-हेल्थ कार्डचा वापर, तसेच फायदे ठळकपणे मांडले.

 श्री. कांदळगावकर म्हणाले, की ई-हेल्थ कार्डमध्ये महत्त्वाची माहिती सुरक्षित, आटोपशीर व संगणकाला वाचता येईल अशा पद्धतीने साठवली जाते. हे कार्ड HIPAAHL7 मापदंडांचे पालन करणारे असून ते माहितीसाठ्याची सुरक्षितता व गोपनीयता राखते, तसेच नैतिक प्रथेच्या आधारस्तंभाचा आदर करते. ते सुसूत्रितपणे सर्व आरोग्यसुरक्षा सेवा पुरवठादार व ग्राहकांना ऑनलाईन कधीही, कुठेही लाईव्हवायरवर जोडते. या कार्डाचा धारक व संबंधित आरोग्य सेवा पुरवठादार सेवा देण्या-घेण्यासाठी अखंड संपर्कात राहतात आणि ग्राहकाची वैद्यकीय माहिती ऑनलाईन एकाच ठिकाणी कार्यक्षम, किफायती व वेगवान सेवेद्वारे प्राप्त होते.

 ते पुढे म्हणाले, की वैद्यकीय तपशीलाचा मागोवा ठेवण्यासाठी लागणारा वेळ ई-हेल्थ कार्ड कमी करते, ते सर्व आरोग्यसुरक्षा क्षेत्रांसह चौफेर संपर्क पुरवते, आपत्कालीन स्थितीत सर्व वैद्यकीय माहितीसाठा तत्काळ उपलब्ध करुन देते. हे कार्ड अपलोड करण्यास सोपे असून त्यात सर्व वैद्यकीय माहितीसाठ्याबरोबरच विमा माहितीसाठाही अपलोड करता येतो. ते जगभर अखंड व एकात्मिक संपर्क मिळवून देते, निदान व विश्लेषण करताना डॉक्टरांच्या वेळेची मोठी बचत होते, अनावश्यक व भारंभार कागदोपत्री तपशील, तसेच इतर प्रशासकीय खर्च टाळला जातो. यावर ई-प्रिस्क्रिप्शन्स सुविधा, ऑनलाईन अपॉईंटमेंट्स घेणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रिस्क्रिप्शन व प्रशासकीय कामांतील कागदोपत्री नोंदी वाचवणे अशा सुविधा मिळतात. सर्व अहवालांसाठी बॅक-अप सपोर्ट मिळतो, लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय केसेसचा मागोवा घेऊन तपासणी करता येते ज्यामुळे रुग्णांत सुधारणा होते आणि प्रभावी संपर्क व संवाद पुरवता येतो, तत्काळ संपर्कासाठी एमहेल्थ मोबाईल प्लिकेशनही सज्ज आहे.

 वापरकर्ते, डॉक्टर व आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी एनकॉर्ड ई-हेल्थ कार्डचे फायदे पुढीलप्रमाणे :

·        ई-हेल्थ कार्ड वैद्यकीय तपशील राखण्यास व त्याचा मागोवा घेण्यास लागणारा वेळ कमी करते.

·        सर्व आरोग्यसुरक्षा क्षेत्रांसह चौफेर (३६० डिग्री) संपर्क पुरवते.

·        आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय माहितीसाठा तत्काळ उपलब्ध करते.

·        हे कार्ड सर्व वैद्यकीय माहितीसाठा सोप्या पद्धतीने अपलोड करते व साठवते.

·        विमा माहितीसाठाही अपलोड करता येतो.

·        जगभर अखंड एकात्मिक संपर्क

·        डॉक्टरांचे निदान व विश्लेषण यासाठीचा वेळ प्रचंड कमी होतो.

·        अनावश्यक व भारंभार कागदोपत्री नोंदी, तसेच इतर प्रशासकीय खर्च टाळते.

·        ई प्रिस्क्रिप्शन सुविधा पुरवते.

·        ऑनलाईन अपॉइंटमेंट्स घेणे व त्यांचे व्यवस्थापन करणे शक्य होते.

·        प्रिस्क्रिप्शन्स व प्रशासकीय कामकाजातील कागदोपत्री नोंदी कमी करते.

·        सर्व अहवालांसाठी बॅक-अप सपोर्ट

·        लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय केसेसचा मागोवा घेऊन तपासणी करता येते.

·        रुग्णांत सुधारणा घडवते व प्रभावी संपर्कासह संवाद सुविधा पुरवते.

·        तत्काळ संपर्कासाठी एमहेल्थ मोबाईल प्लिकेशन

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...