अखेर नवनीत-रवी राणा दाम्पत्याला अटक

Date:

मुंबई-खार पोलिसांकडून राणा दाम्पत्याना अटक करण्यात आली आहे. त्यांची आजची रात्र खार पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्राथमिक माहिती आहे. पण उद्या रविवार असल्यामुळे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणा दाम्पत्यावर भादंवि कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दखलपात्र गुन्हा आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य करून भावना दुखावल्याबद्दल राणा दाम्पत्यांविरुद्ध शिवसेनेने तक्रार दिली. त्यानुसार राणा दाम्पत्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस राणा दाम्पत्यांना नेण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा पोलीस आणि राणा दाम्पत्य यांमधील सर्व संवाद सोशल मीडियातील राणा यांच्या अकौंट वरून लाइव्ह करण्यात आले. त्यावरून आतील घडामोडी जशास तशा समजल्या

राऊतांवर गुन्हा दाखल करा – नवनीत राणा

आमच्यावर गुन्हा दाखल केला तर संजय राऊत आणि अनिल परबांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी पोलिस – राणा दाम्पत्यात बाचाबाची झाली असून आवाज खाली करा अशा शब्दात नवनीत राणा यांनी पोलिसांना सुनावले .

आमदार रवि राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की, आमच्यावर गुन्हा दाखल केला जात असेल तर आम्हाला मान्य नाही, आमच्यावरही संजय राऊत आणि ईतर शिवसेना नेत्यांनी टीका केली आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा. आमच्यावर गुन्हा मान्य नाही हा आमच्यावर अन्याय आहे असेही राणा यांनी सांगितले.

नवनीत राणांनी सुनावले पोलिसांना

पोलिस राणा दाम्पत्यांच्या घरात पोहचल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येण्याबाबत राणा दाम्पत्यांना सुचना केली. त्यावेळी आम्ही ठाण्यात येणार नाही. आम्हाला वाॅरंट द्या त्याशिवाय आम्ही येणार नसल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. अमरावतीच्या घरावर शिवसैनिकांनी आंदोलन केले. संजय राऊत पत्रकार परिषदेत आम्हाल गाडून टाकण्याची भाषा करीत आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवा असे राणा यांनी पोलिसांकडे मागणी केली .​​​ महाराष्ट्र बंगालच्या दिसेने जात असल्याच्या संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

राणा दाम्पत्यांच्या घरासमोर शिवसैनिक आंदोलन करीत असून ते संतप्त झाले . राणांना घराबाहेर पडू देणार नाही असा त्यांचा पावित्रा होता . तत्पुर्वी राणा दाम्पत्यांनी माफी मागतली तरच राणा दाम्पत्यांला बाहेर पडू देऊ असे शिवसैनिकांनी म्हटले . राणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 2 पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या होत्या .पोलिस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील हे राणांच्या घराबाहेर होते . पोलिसांना सहकार्य करणार, मात्र माफी मागितल्या शिवाय राणांना बाहेर पडू देणार नाही असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.

हनुमान चालिसा पठणासाठी मातोश्रीवर जाण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना रोखण्यासाठी शिवसेनेने मुंबईत चांगलीच फिल्डिंग लावली होती . एकीकडे मातोश्रीच्या रक्षणासाठी शिवसैनिक काल रात्रीपासूनच या परिसरात ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता . राणा यांच्या घराबाहेरही शेकडो शिवसैनिक जमा झाले होते . काल पत्रकार परिषदेत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपण सकाळी 9 वाजता मातोश्रीवर पोहोचणार असल्याचे सांगितले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...