पुणे -पुण्याचा दुसरा कलमाडी असा ज्यांचा उल्लेख आता होऊ लागला आहे , त्या राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णयाच्या समर्थनार्थ रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले .भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि काही काकडे समर्थक, काही इच्छुक तर काही कुंपणावरचे नगरसेवक या मध्ये सहभागी झाले होते . प्रारंभी लक्ष वेधले ते कधी काळी कलमाडींच्या तालमीत असलेले शंकर पवार , यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसमवेत या रॅलीत अखेरपर्यंत सहभाग नोंदविला तसेच पप्पू घोलप , शाम शिंदे , अमोल हुलावळे यांच्यासह आमदार योगेश टिळेकर श्रीनाथ भिमाले , हेमंत रासने हे देखील या रॅलीत दिसले . मात्र भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट आणि अन्य भाजपचे आमदार मात्र या रॅलीकडे फिरकले नाहीत .
एकूण ही रॅली मोदींच्या समर्थनासाठी होती ? कि शहर नेतृत्वाच्या -वर्चस्वाच्या लढाईसाठी होती हा विषय मात्र आता अनेक अंगांनी काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ शकेल अशी स्थिती आहे .
डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार संजय काकडे आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर तसेच उषा काकडे यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर या रॅली ला प्रारंभ झाला . पहा या रॅली चा हा अल्पसा व्हिडीओ…..