पुणे- सैनिकांच्या शोर्याचे आणि भावनांचे राजकारण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवून दडपशाहीचा कारभार करीत असल्याचा आरोप करीत आज पुणे शहर काँग्रेस ने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली .
पुणे येथील जिमखान्यावरील गोपालकृष्ण गोखले चौकात झालेल्या या आंदोलनात , शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री , माजी महापौर, बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड , उल्हास पवार, कमल व्यवहारे,अजित दरेकर , सदानंद शेट्टी , महेश वाबळे, ज्योती परदेशी,शैलजा खेडेकर, अमित बागुल,चंद्रशेखर कपोते आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .