पुणे-स्त्रियांमध्ये उपजतच मॅनेजमेंट कला असते ,दैनंदिन जीवनामध्ये, याच कलेचा वापर करून आपल्यासाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न त्या करतात, आणि त्यात यशस्वीही होतात असे प्रतिपादन येथे महापौर मुक्ता टिळक यांनी केले .
तेजस्विनी मंच आयोजित ‘शक्ती पुरस्कार’ वितरण सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. समाजामध्ये ठळक असे कर्तृत्व गाजवून, ज्यांनी समाजाला एक दिशा दिली आहे, अश्या हिरकणीचा सन्मान करून, त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा गेली 2 वर्षे आयोजित करण्यात येत आहे, असे तेजस्विनी मंचाच्या संस्थापिका व नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे म्हटल्या. सत्कार मूर्तींमध्ये सुचेता फासे, प्राचार्य दिलासा केंद्र, वसुधा खरे, अध्यक्ष सुरभी महिला नागरी सहकारी पतसंस्था,डॉकटर मृणमयी अवचट,राणी थोपटे, अंगणवाडी शिक्षिका, पूनम तेलंग, जीविका फाउंडेशन, आपलं बालभवन च्या वृंदा देशपांडे, शास्त्रीय गायिका पल्लवी पोटे, व 15 वर्षांपासून वस्ती विभागात बचत गट व महिला उद्योग गट चालवणारे प्रीती सोनवणे,यांचा समावेश होता. भालाफेक मध्ये राज्यस्तरावर 9 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 2 रौप्य 1 कांस्य गीता शिंदे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामाजीक भोंडल्याने झाली, ज्यामध्ये ‘बेटी बचाव,बेटी पढाओ’ आणि कचरा वर्गीकरण चा संदेश देणारया गीताचे सादरीकरण झाले .
कार्यक्रम शिवसागर सिटी हॉल, सनसिटी रोड, आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे येथे संपन्न झाला.सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते