फिटे अंधाराचे जाळे’ मधून अजरामर मराठी गीतांची सांगीतिक सफर

Date:

प्रख्यात गायक श्रीधर फडके व सहका-यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३८ व्या वर्धापनपदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सव ; गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवास रसिकांसाठी विनामूल्य कार्यक्रम

पुणे : संगीत क्षेत्रातील दिग्गज सुधीर फडके उर्फ बाबूजी, ग.दि. माडगूळकर, सुधीर मोघे, लता मंगेशकर यांसह इतरही कलाकारांनी अजरामर केलेली गीते सादर करीत प्रख्यात गायक श्रीधर फडके व सहका-यांनी मराठी गीतांची सांगीतिक सफर पुणेकरांना घडविली. अवीट गोडीची व सुरेख चालीची गीते ऐकताना रसिक श्रोत्यांनी शब्द स्वरांचा संवाद यावेळी प्रत्यक्षपणे अनुभवला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संगीत महोत्सवाचे. महोत्सवात पहिल्या सत्रात तबला व बासरी अशी वाद्य जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. त्यामध्ये सोहम गोराणे व अनहद वारसी यांनी वादन केले. तर, प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा फिटे अंधाराचे जाळे हा कार्यक्रम दुस-या सत्रात झाला.

देव देव्हा-यात नाही… या बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या आणि ग.दि. माडगूळकर यांच्या सदाबहार गीताने दुस-या सत्रात स्वर मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सादर झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींवरील देवाचिये द्वारी… या संत रचनेत श्रोते तल्लीन झाले. सुधीर मोघे यांचे सखी मंद झाल्या तारका… या गीताला रसिकांनी टाळ्यांनी भरभरून दाद दिली. शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी (सहगायन), तुषार आंग्रे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), निलेश देशपांडे (बासरी), केदार परांजपे (कीबोर्ड) यांनी साथसंगत केली. सुकन्या जोशी यांनी निवेदन केले.

पहिल्या सत्रात सोहम गोराणे याने तबल्यावर पं. सुशीलकुमार जैन, उस्ताद झाकीर हुसैन यांच्या रचना सादर केल्या. तर, नांदेडच्या अनहद वारसी याने बासरीवर राग पुरीया धनाश्री व माझे माहेर पंढरी हे गीते सादर केले. अभिषेक सिनकर याने त्यांना पेटीची साथ दिली.

गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० यावेळेत युवा कलाकार व सायंकाळी ७ ते १० यावेळेत दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...