मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांची होतेय मुस्कटदाबी (व्हिडीओ )

Date:

ठराविक अधिकाऱ्यांची कारस्थाने पाठीशी घालण्याचे कारण असल्याचा दावा

भाजपचे बहुसंख्य नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज

कोरोनाचा खर्च मुख्य सभेत जाहीर करण्यास टाळाटाळ

कचरा ,पूरस्थिती सर्वच प्रश्नांची पुन्हा पुन्हा गळचेपी

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/662248038051803/

पुणेगेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. वॉर्ड ऑफिसकडून आवश्यक मनुष्यबळाअभावी सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनावरचा खर्च आणि त्याचा उपयोग जाहीर तरी करा अशा विविध प्रश्नांवर केवळ कॉंग्रेस राष्ट्रवादीचेच नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांच्या प्रश्नांची देखील गळचेपी होत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले आहे.आॅनलाईन उपस्थिती लावणारी नगरसेवक मंडळी तर …उत्तरे तर सोडा पण प्रश्न हि धड मांडू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कालच्या मुख्य सभेत भाजपचे सहकरी पक्षाचे आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रश्नांना देखील वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या . एवढेच नव्हे तर माजी सभागृह नेते भिमाले यांनी ,’ आम्हाला माहिती आहे तुमचे पक्षनेत्यांचे जे ठरलेय तेच तुम्ही करणार ‘ अशा स्वरूपाचे विधान केले आहे . त्यामुळे महापालिकेची मुख्य सभा हि आता निव्वळ ‘फार्स ‘ किंवा रंगमंच बनल्याचे स्पष्ट होत आले आहे. सभेत नेमके काय कसे करायचे ते सर्व गटनेत्यांच्या गोपनीय बैठकीत अगोदरच ठरत असल्याचे जगजाहीर झाले आहे.

सत्ताधाऱ्यांसह विरोधक आपापले प्रश्न मांडत असतानाच त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मुख्य सभा तहकूब करण्याची प्रथा ,परंपरा नव्याने निर्माण करण्यात आली आहे आणि ती या वर्षी जोरदार पाने राबविण्यात येते आहे.

रिपाइंचे नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, भाजप नगरसेवक आदित्य माळवे, अविनाश बागवे, गफूर पठाण अरविंद शिंदे यांच्यासह अन्य नगसेवकांनी विविध प्रश्न मांडले ,पण त्यांना स्रावांना डावलण्यात आले. कोरोनाकाळात साथीचे रोग पसरण्याची भिती व्यक्त करत महापालिकेने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी सदस्यांकडून करण्यात आली.परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याकडे दूर्लक्ष करत मृत्यूमुखी पडलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीप्रती श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...