राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन

Date:

मुंबई, दि. 29: राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्य सचिव श्री. मेहता यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष इंजि. विनायक लहाडे, संघटन सचिव सुदाम टाव्हरे, महिला प्रतिनिधी वंदना गेवराईकर, मंत्रालय अधिकारी संघटनेचे विष्णू पाटील उपस्थित होते.

आतापर्यंतच्या सर्व मुख्य सचिवांचे महासंघास चांगले सहकार्य मिळाल्याचे यावेळी श्री. कुलथे यांनी सांगितले. ते म्हणाले की, श्री. मेहता यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मोठा प्रशासकीय अनुभव राज्यातील अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्रीदेखील महासंघाच्या मागण्यांविषयी सकारात्मक असतात. मात्र, अजूनही काही प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महासंघाच्या कार्यकारिणीची 4 जून रोजी बैठक असून त्यापूर्वी मुख्य सचिवांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महासंघाने मुख्य सचिवांना निवेदन दिले. त्यामध्ये 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी अहवाल, सुधारित वेतनावर वाहतूक भत्ता, 5 दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्र शासनाप्रमाणे 60 वर्षे करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धतीने नेमणुका न करणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर सेवासुविधा आदी मागण्यांचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...