परंपरेनुसार आमच्या घरातच उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं पण …
आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती
पुणे-एखाद्या विद्यमान आमदारांच्या निधनाने पोटनिवडणुकीत त्यांच्या घरातील कोणाला उमेदवारी देण्याची परंपरा आहे त्यानुसार आम्हाला उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं पण कसब्यात तसं झाले नाही ,परंपरागत उमेदवारीसाठी आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती. ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसच घरी आले होते,आमच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही पण आम्ही पक्षाच्या आदेशाचं आम्ही पालन करू अशा आशयाची विधाने स्वर्गीय मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी काही माध्यमांशी बोलताना केल्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीवर मनापासून ते समाधानी नसल्याचेच दिसून आले आहे . 20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील मुक्ताताईंच्या सहकार्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. इतरांनी उमेदवारी मागितली नसती तर मुक्ता टिळकांना ती खरी श्रद्धांजली लाभली असतीअसेही टिळक यांनी म्हटले आहे.
शैलेश टिळक म्हणाले की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पोट निवडणूक जाहीर झाल्यावर आम्ही घरात उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. कारण मुक्ता टिळकांच्या अकाली जाण्याने त्यांची अनेक कामं अर्धवट राहिली आहेत. त्यांनी सुरू केलेल्या योजना होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, असं आम्ही म्हटलं होतं. त्यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती. ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसच घरी आले होते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
ते पुढे म्हणाले होते की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर ते अंत्यसंस्कारानंतर घरी आले नव्हते. त्यामुळे ते भेटीसाठी घरी आले असावेत, असा अंदाज शैलेश टिळकांनी व्यक्त केला होता. पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी स्पष्ट संकेत दिले नाहीत. सर्व दृष्टीने विचार करुन आम्ही काही नावं वर पाठवली आहेत. त्यावर दिल्लीवरुन यासंदर्भात निर्णय होईल, अशा चर्चा देवेंद्र फडणवीसांशी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
पोटनिवडणुकीची तयारी म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यासाठी लागत असणारे कागदपत्र आणि उमेदवारी अर्जाचा योग्य अभ्यास करण्यासाठी लवकर घेतला. त्यामुळे उमेदवारी आम्हालाच मिळेल असा त्याचा अर्थ होत नसल्याचंही ते म्हणाले होते. साधारण जेव्हा एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्याच्या घरातील व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार केला जातो. त्यामुळे परंपरेनुसार असाच विचार यावेळीदेखील होईल असं वाटत असल्याचं ते म्हणाले होते. आमच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशाचं आम्ही पालन करू, असं स्पष्ट केलं होतं.
कुणाल टिळक यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की माझ्या सारख्या तरुणाला संधी दिली त्याबद्दल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे. या मोठ्या पदासाठी पक्षश्रेष्ठींनी माझा विचार केला. त्यामुळे मी समाधानी आहे, असं ते म्हणाले.