महावितरणकडून १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा आदेश

Date:

आठवड्याभरात १ लाख वीजमीटर उपलब्ध होणार  

मुंबई: महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा २ लाख मीटरची आवश्यकता भासते. सद्यस्थितीत २२ एप्रिलपर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ लाख ३१ हजार ८०२ मीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबर २०२२ पर्यंत तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या ३० एप्रिलपर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात ३ लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होत जाणार आहेत.

या व्यतिरिक्त दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १.५० लाख थ्रीफेज  मिटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्रीफेज  मिटरचा पुरवठा येत्या मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी २० लाख सिंगल फेज मिटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शिवाय मा. वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषीग्राहकांना प्रिपेड मिटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या कृषिग्राहकांना दिड लाख प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यत पूर्ण करण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना रुपाली पाटलांनी घातले साकडे

पुणे-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला...

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव पुणे : साडेतीन...