‘नवप्रकाश’ योजनेतून 5.70 लाख वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

Date:

 

दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत 5 टक्के सूट

पुणे,  : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 5 लाख 70 हजार वीजग्राहकांना महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे.

महावितरणच्या पुणे, कोल्हापूर व बारामती या परिमंडलात दि. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 5 लाख 70 हजार उच्च व लघुदाब थकबाकीदारांसाठी ‘नवप्रकाश’ योजना सुरु आहे. या थकबाकीदारांकडे 472 कोटी रुपयांची मूळ थकबाकी, 98 कोटी 58 लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी 4 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी आहे.

‘नवप्रकाश’ योजनेत येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये 5 टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. दि. 1 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच दि. 1 फेब्रुवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.

मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सोय व संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. ‘नवप्रकाश’ योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची 2 टक्के रक्कम भरण्याची अट रद्द करण्यात आली आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी नजिकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील

393 वीजग्राहक थकबाकीमुक्त

पुणे, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडलातील 393 वीजग्राहक तडजोडीतून थकबाकीमुक्त झाले आहे. या थकबाकीदारांशी झालेल्या तडजोडीतून 26 लाख 91 हजार रुपये देयकांपोटी मिळणार आहेत.

पुणे परिमंडलातील थकबाकीदारांची दाखलपूर्व प्रकरणे अंतीम निकालासाठी या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या थकबाकीदार 393 वीजग्राहकांना महावितरणच्या थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला व त्यांनी  थकीत देयकांपोटी 26 लाख 91 हजार रुपये भरण्याचे मान्य केले. रास्तापेठ मंडलमधील 172 थकबाकीदार ग्राहकांनी 12 लाख 42 हजार, गणेशखिंड मंडलमधील 50 ग्राहकांनी 6 लाख 5 हजार तर पुणे ग्रामीण मंडलमधील 171 थकबाकीदारांनी 8 लाख 44 हजार रुपयांची थकबाकी भरण्याचे मान्य केले आहे. थकबाकीचा भरणा केल्यानंतर संबंधीत वीजग्राहकांना मागणीनुसार नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मार्ट मीटरची छेडछाड अंगलट;भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणकडून गुन्हे दाखल

मीटरचे सील तोडून गती कमी करण्याचा प्रयत्न ९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी; उर्वरित १० प्रकरणांत कारवाई सुरू पुणे, दि. ७ सप्टेंबर २०२६ : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीज वापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे. चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला. स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे. गुन्हा दाखल झालेली प्रकरणे महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे : •             शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली = २,६६,८०० रुपये •             सचिन भास्करराव तायडे = १,१८,३६० रुपये •             सुरज संजीवकुमार सूर्यवंशी = १,५३,७७० रुपये •             दयानंद श्रीमंत रसाळ = १,४६,०७० रुपये •             संदीप लक्ष्मण गवळी  = १,५६,५९० रुपये •             विष्णू सखाराम चोपडे = १,४०,४१० रुपये •             भगवत नारायण इंगळे = १,४६,६५० रुपये •             आनंद जी. = ६८,८६३ रुपये •             ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = ४३,६२२ रुपये

दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी-ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन पुनर्निमाण सोशल फाऊंडेशनच्या वतीने...

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

सुप्रिया सुळे, रोहित पवारांसह विविध पक्षांचा पाठिंबा; पेपरफुटी, निकालातील...