पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त महावितरण व कोल्हापूर येथील सद्गुरु श्री. विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीने महिलांचे आहार, विहार व आरोग्य या विषयावर मंगळवारी (दि. 8) मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सेनापती बापट मार्गावरील महावितरणच्या प्रकाशभवनातील लघु प्रशिक्षण केंद्गात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. स्वाती व्यवहारे (मुंबई) यांच्याहस्ते झाले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाव्यवस्थापक (ईआरपी) श्रीमती शैलजा सावंत, वैद्य सौ. आरती व्यास, वैद्य श्री. नवनाथ घुगे, कार्यकारी अभियंता सौ. पुनम रोकडे यांची उपस्थिती होती.
या एकदिवसीय कार्यशाळेत वैद्य सौ. आरती व्यास, श्री. नवनाथ घुगे, श्री. राहुल शेलार यांनी महिला आहार, विहार व आरोग्य यावर प्रबोधन केले व आरोग्य तपासणी केली. त्यांना वैद्य सुनिता खुडे, अश्िवनी टेमगिरे, केतकी पाटील, बिजल झवेरी, रुचिता वरोळे आदींनी सहाय्य केले. या कार्यशाळेत महावितरणच्या सुमारे 145 महिला अधिकारी, अभियंता, कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या आयोजनासाठी लघु प्रशिक्षण केंद्गाचे समन्वयक व उपकार्यकारी अभियंता श्री. नवीनचंद्ग वैद्य यांनी पुढाकार घेतला.