भोसरीमध्ये पादचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याप्रकरणी महावितरणचा संबंध नाही

Date:

पिंपरी,: भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता दुभाजकावरील वीजखांबाच्या वायरचा शॉक लागल्यामुळे पादचाऱ्याचा रस्त्यावर पडून ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. मात्र या घटनेत वीजखांबाच्या (पथदिव्याच्या) वायरचा शॉक लागल्याप्रकरणी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

भोसरी येथील धावडेवस्तीमध्ये रस्ता ओलांडताना दुभाजकावरील वीजखांबाचा वायरचा शॉक लागून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकने दिलेल्या धडकेत रवी महादेव जोगदंड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणकडून लगेचच स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये सदर वीजखांब हा पथदिव्याचा (स्ट्रीटलाईट) आढळून आला. या पथदिव्यांची वीजयंत्रणा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असून त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबादारीही महानगरपालिकेकडेच आहे. त्यामुळे पथदिव्याशी व शॉक लागल्याच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही. याबाबत महावितरणकडून संबंधीत पोलीस स्टेशनला लेखी पत्राद्वारे देखील कळविण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...