महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Date:

मुंबई – राज्यात करोना विषाणू बाधित वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
    वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करत महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रावर रांगेत ताटकळत उभे राहून गर्दी करण्यापेक्षा महावितरणच्या आठवड्यातील 7 दिवस 24 तास उपलब्ध ऑनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा केल्यास कोरोना विषाणूच्या संभावित प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे, वीज पुरवठ्याशी संबंधित सुविधेबाबत तक्रार दाखल करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने वीज ग्राहकांनी जाणिवपूर्वक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले.
    वीज बिल भरण्यासाठी, नवीन वीज जोडणीसाठी, अर्ज करण्यासाठी, वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड ,नेटबँकीग,मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याव्यतीरिक्त महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२ या टोल फ्री क्रमांकावर काॅल करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
—————————————
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“मोफत पाणी” टँकर चा महाघोटाळा… खर्डेकर यांचे आयुक्तांना साकडे

पुणे:पटवर्धन बागेतील टँकर पॉईंट येथील बंद मीटर चा घोळ...

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...