राज्यात ‘गो-ग्रीन’मध्ये पुणे परिमंडल आघाडीवर

Date:

पुणे: वीजबिल किंवा पावतीच्या कागदाचा वापर बंद करून पर्यावरणस्नेही बनण्याची संधी महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली असून पुणे परिमंडलातील 24 हजार 364 ग्राहकांनी सहभाग नोंदवून राज्यात आघाडी घेतली आहे.

महावितरणने पर्यावरणपुरक योजना म्हणून छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत जाहीर देण्यात येत आहे. या योजनेमुळे वीजग्राहकांचे देखील वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल दरमहा ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे मिळणार असल्याने ते लगेचच ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. ज्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त बिल किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेले वीजबिल डाऊनलोड व प्रिंट करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे ही वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत व ते रंगीत स्वरुपात देखील प्रिंट केले जाऊ शकते.

पुणे परिमंडल अंतर्गत गणेशखिंड मंडलमधील शिवाजीनगर, कोथरूड, पिंपरी व भोसरी विभागांत 10,855, रास्तापेठ मंडल अंतर्गत नगररोड, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन व रास्तापेठ विभागांत 9861 आणि पुणे ग्रामीण मंडलमधील मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागांमध्ये 3648 अशा एकूण 24 हजार 364 वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे.

वीजबिलासाठी ग्राहकांनी छापील कागदाऐवजी ईमेलचा पर्याय निवडल्यास त्यांचा पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे व वीजबिलात दरवर्षी 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय महावितरणने ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सुट दिली असून क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा निःशुल्क करण्यात आलेला आहे. त्यामुळे छापीलऐवजी वीजबिलांचे व पावत्यांचे सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करणे सोयीचे होणार आहे. तसेच मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या पुणे परिमंडलातील सुमारे 27 लाख 69 हजार वीजग्राहकांना ‘एसएमएस’ द्वारे बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर आदींसह विविध स्वरुपाची माहिती निशुल्क दिली जात आहे.

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...