वडगाव शेरीमधील कारखान्यात 28.79 लाखांची वीजचोरी उघड वीजचोरीसाठी ‘रिमोट कंट्रोल’चा वापर

Date:

पुणे, दि. 29 : शहरातील वडगाव शेरी येथील मे. वसुंधरा पॉलिप्लास्ट कारखान्यात ‘रिमोट कंट्रोल’ द्वारे सुरु असलेली वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. यात 2,21,676 युनिटची म्हणजे 28,79,875 रुपयांची वीजचोरी आढळून आली. याप्रकरणी कारखान्याच्या मालकाविरुद्ध सोमवारी (दि. 29) फौजदारी गुन्हा दाखल झाला.

याबाबत माहिती अशी, की नगररोड विभाग अंतर्गत वडगाव शेरीमधील टेम्पो चौक येथे वसुंधरा पॉलिप्लास्ट हा प्लॅस्टिक मोल्डींगचा कारखाना आहे. या कारखान्यात औद्योगिक वीजजोडणी आहे. तथापि या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्यामुळे वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटर यंत्रणेतील वायरिंगमध्ये फेरफार करून सीटीमध्ये (करंट ट्रान्सफॉर्मर) रिमोट कंट्रोलचे अतिरिक्त सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले व एकूण 2,21,676 युनिटची म्हणजे 28 लाख 79 हजार 875 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले.

ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. किशोर पाटील, श्री. अंकुर कावळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. वसंत होनराव, श्री. उदय भोसले, सहाय्यक अभियंता श्री. कैलास कांबळे, अपर्णा माळी, कल्पना चौधरी, तंत्रज्ञ सर्वश्री मच्छिंद्ग बोराडे, साईनाथ दांगडे, संदीप राऊत आदींनी योगदान दिले.

वीजचोरीप्रकरणी वसुंधरा पॉलिप्लास्टचे मालक रितेश मोहनलाल माली विरुद्ध सोमवारी (दि. 29) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...