वीजबिल भरणा केंद्र 31 मार्चला सुरु राहणार

Date:

पुणे: थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व वीजबिल भरणा केंद्र रविवारी, दि. 31 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.

पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी रविवारी (दि. 31) सार्वजनिक सुटी असली तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट, 9 कामगारांचा अंत

रायपूर: छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराय येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये...

फुले-आंबेडकरांचा प्रगतशील विचार मनामनात रुजावा- सतीश राऊत

आंबेडकर जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन पुणे: "चांगल्या शिक्षणातून व...