मुंबई, :
वीजचोरी प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील विनायक निंबा पवार यास शहादा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कारावास व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
नंदुरबार येथील महावितरणचे भरारी पथक तपासणी करीत असताना त्यांना शहादा येथील विनायक निंबा पवारच्या वीजमीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून भरारी पथकाचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री. बी.एस. तायडे यांनी पवारविरुध्द विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135 (1) (ब) नुसार महावितरणच्या नाशिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. डिसेंबर 2011 मध्ये ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी विनायक पवारने वीजचोरी केल्याचे सिध्द झाल्याने त्यास शहादा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कारावास व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.