मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.
ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता.
ईडीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात आहे असा ईडीचा आरोप आहे. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीच्या वेळी संजय राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते.
संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. त्या वेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले. या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली. पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते. मात्र यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते.असा ईडीचा आरोप आहे.