पुणे भाजपचे नेतृत्व आता चंद्रकांत पाटलांकडेच…

Date:

पुणे- येथील भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वो असलेले, जुनेजाणते नेते,खासदार गिरीश बापट यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाल्यानंतर पुणे पोरके झाल्याची भावना व्यक्त करणारे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच पुण्यातील भाजपचे नेतृत्व देण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधून सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.यामुळे कोथरूड मतदार संघ आता पुन्हा मेधा कुलकर्णींना मिळण्याची जास्त शक्यता वर्तविली जाते आहे.पुणे लोकसभेच्या पोट निवडणुकीबाबत भावनिक वक्तव्ये होत असली तरी वास्तवता नाकारता येत नाही.तातडीने पुण्याच्या नेतृत्वाबाबत अथवा पोटनिवडणुकीबाबत वक्तव्ये करणे भावनिकदृष्ट्या योग्य नसून शक्यतो पोटनिवडणूक होऊ नयेच आणि थेट लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच येथील निवडणूक व्हावी अशी भावना वरिष्ठ नेत्यांची आहे,६/६ महिन्यांसाठी निवडणुकीचा खेळ करण्याची तयारी कोणाची नाही.परंतू अद्याप दिल्लीश्वरांचेच निवडणुकांसंदर्भात असलेले धोरण आणि विचार समजले नसल्याने अनेकजण केवळ तर्क वितर्क लढविताना दिसत आहेत.

जर स्वरदा बापटांनाच लोकसभेची उमेदवारी दिली तरच भाजपा पुण्याची जागा राखू शकेल असाही विचारप्रवाह पक्षात आहेच.पण येत्या काळत महापालिका विधानसभा आणि लोकसभा अशा सर्वच निवडणुकांचा सामना करायचा असल्याने याबाबत अंतिम धोरण दिल्लीतच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्ज मुक्त; ७० अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा!

'पीएमआरडीए'ची धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जविरोधातील कारवाईसत्र सुरूच राहणार! पुणे :...

वाढदिवस,लग्न समारंभ, सण व कौटुंबिक आनंदाचे क्षण साजरे करताना सामाजिक भान महत्त्वाचे – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे "अब नॉर्मल" दिव्यांग केंद्राला आवश्यक साहित्य...

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, संविधान रक्षणाच्या लढाईत अनुसुचित जातीची भूमिका महत्वाची: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांचा...

वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंनी थेट जैनांच्या प्रतिनिधींना सुनावले

जिरेटोप प्रकरणी मराठीत माफीनामा-कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता?-आमची...