पुणे-भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर मधील कोरोना मृत्यू चा उल्लेख करत पुणे महापालिकेने शिवाजीनगरच्या जम्बो कोविड सेंटर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला नाही तर मी महापालीकेविरोधात गुन्हा दाखल करेल असे आज येथे स्पष्ट केले आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणार्या उद्धव ठाकरे यांच्या गुंडावर लवकरच कारवाई होणार आहे . ते पुढे म्हणाले की,पुणे महापालिकेच्या आवारामध्ये ५ फेब्रुवारी २०२२ रोजी उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला होता.त्या हल्लेखोर आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल झाला.पण त्या आरोपी विरोधात तत्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.मात्र सध्याचे आयुक्त रितेश कुमार यांच्या माध्यमातून तपासला गती प्राप्त झाली असून भविष्यामध्ये माझ्यावर हल्ला करणार्या उद्धव ठाकरेंच्या ३३ गुंडावर निश्चित कारवाई होणार असल्याचे संकेत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. तसेच तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरातील होते.अमिताभ गुप्ता यांनीच करोना काळात राजेश वाधवान याला पळवून जाण्यास मदत केली होती आणि त्यांच्याच(तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता)काळात माझ्यावर जीव घेणा हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.