कुणाची हाॅटेल्स सिंगापूर, लंडन, श्रीलंकेला आहेत, कुणाच्या प्राॅपर्ट्या कुठे आहेत हे मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही
असले १०० भास्कर जाधव मी खिशात घालून फिरतो
रत्नागिरी-वर्षभर मला गाडीत बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. मी स्वतः गोळी झेलेन पण तुमच्या उद्धवजींच्या केसाला धक्का लागू देणार नाही हे मी शिवसेनाप्रमुखांना सांगत होतो. याची परतफेड केलीत काय ?एकदा बाहेर जा आणि दहा किमी अंतरात पब्लिक जाम कसा झाला हे पाहा. उद्धव ठाकरेंना कळवा की, माझी ताकद काय ते.असा घणाघात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. ते खेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
”उद्धव ठाकरेंनी मला धोका दिला. गाफिल ठेवले. एका नेत्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुमचे काय घोडे मारले ते सांगा. उद्धव ठाकरे कटात नव्हते पण गटात होते. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली,रामदास कदम म्हणाले, होय बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला पण बाळासाहेब असेही म्हटले होते की, मला काॅंग्रेस, सोनिया गांधींसोबत जायची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकेल हे म्हटले होते. उद्धव ठाकरे तुम्ही सभा लाईव्ह बघत असाल तेव्हा तुम्हाला माझा सवाल आहे. भास्कर जाधवांनी बघावे किती गर्दी जमली ते. शिवाजी पार्कही कमी पडले असते.
रामदास कदम म्हणाले, शिवसेना मोठी कुणाची हे दसऱ्याच्या सभेलाच शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. एक गोष्ट सांगा. 2009 ला मी दापोलीसाठी तिकीट मागितले मला गुवाघरचे तिकीट दिले. तुम्ही मला पाडण्याचा प्रयत्न करीत होते.रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला धोका दिला. गाफिल ठेवले. त्याच नेत्याच्या खांद्यावर बंदुक देऊन उद्धव ठाकरेंनी माझा मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुमचे काय घोडे मारले ते सांगा. गुन्हे आम्ही अंगावर घेतले. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा मी वर्षभर तुमच्यासोबत गाडीत सोबत समोर बसत राहीलो. मला नांदेड, छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री केले का?रामदास कदम म्हणाले, एपी गद्दार. उद्धव ठाकरेंचा कलेक्टर एपी राष्ट्रीय उत्सवावेळी यायचा. तुम्ही कटात नव्हता पण गटात नव्हता. उद्धव ठाकरे योगेश कदमला पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यात सुभाष देसाईंनी बाकी काम केले. बाळासाहेब ठाकरे वाघांना सांभाळायचे. तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्या – मेंढ्यांना पाळत आहात.रामदास कदम म्हणाले, गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंकडे वीस जणांना घेऊन गेले पण त्यांनी आलेल्यांना हाकलून दिले आणि आता खोके बोलायला लाज वाटत नाही. कुठे तरी लाज बाळगावी. नव्वद साली माझ्याविरोधात उमेदवार होता त्याला दाऊदची साथ होती पण मी डगमगलो नाही.रामदास कदम म्हणाले, अख्खा महाराष्ट्र घेऊन माझ्या मतदारसंघात तुम्ही आले अफजलखानासारखी फौज घेवून तुमची पुन्हा येण्याची हिंमत होणार नाही. आम्ही तुम्हाला खोके दिले ते तर द्यायचे होते ना..रामदास कदम म्हणाले, मिठाईचे खोके मी उद्धव ठाकरेंना दिले एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना दिले. लाज वाटायला हवी, कुणाची हाॅटेल्स सिंगापूर, लंडन, श्रीलंकेला आहेत, कुणाच्या प्राॅपर्ट्या कुठे आहेत हे मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. खोके वाटून तुमची उंची मराठवाड्यात आम्ही वाढवली. मरेपर्यंत डाग लागू देणार नाही. खेडमध्ये हिंदू-मुस्लीमांना एकत्र आणायचे काम मी केले.