मुंबई-महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील दोन नेत्यांची नावं पुढे केली होती. पण नंतर ही नावं मागं पडली आणि उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री बनले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. तसेच आगामी निवडणूक स्ट्रॅटेजीवर चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोटही केला.भुजबळ म्हणाले, “महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होतं. पण जेव्हा उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तेव्हा त्यांनी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांचं नाव त्या पदासाठी नाव सांगितलं. पण शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह शिवसेनेतील सर्व नेत्यांनी उद्धव ठाकरेंना आग्रह केला म्हणून ते मुख्यमंत्री झाले”
उद्धव ठाकरेंनी CM पदासाठी एकनाथ शिंदे ,सुभाष देसाईंचेच नाव दिले होते ,पण ….. छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Date: