मुंबई- आपण सर्वांनी एकत्रित लढायला हवे ती इच्छा हवी. अन्यथा देशात हुकुमशाही चालेल. फूटीचा शापाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. मी नसलो तरी चालेल पण या देशातील लोकशाही जगली पाहीजे. क्रांतिकारकांनी जे बलीदान दिले ते मोदींसाठी नव्हे देशासाठी केले असा जोरदार टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते आज मविआच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुंबईत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यावर नेहमी आरोप केले जातात. त्यात काही वावगं वाटत नाही मी घरी बसून सरकार चालून दाखवले. घरी बसुन मी जे काही करू शकलो ते गुवाहाटीला जावून करू शकले नाही. त्याला मी काय करू शकतो. आज काहीही बोलले तरी जगभर समजते. ते माध्यमांमुळेच.उद्धव ठाकरे म्हणाले, सामील व्हा किंवा आत जा. भाजपमध्ये या किंवा जेलमध्ये जा असा काळ आला आहे. आपल्या ताकदीची परीक्षा पंतप्रधान मोदी नाही शिवराय बघत आहे. दिशा दाखवण्याची वेळ आली आहे. ही लढाई महाराष्ट्रात आपण लढत आहोत. सरकार स्थापन करायचे आपले मविआचे सरकार पुन्हा स्थापन होणारच.उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुत्व म्हणजे धोतर नाही सोडायला. एकत्रित लढण्याची इच्छा हवी. अन्यथा देशात हुकुमशाही चालेल. फूटीचा शापाची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये. मी नसलो तरी चालेल पण या देशातील लोकशाही दगली पाहीजे. क्रांतिकारकांनी जे बलीदान दिले ते मोदींसाठी नव्हे देशासाठी केले. स्वातंत्र्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पक्षाच्या पदरात काही पडले नाही तरी चालेल पण कोणत्याही निवडणुकीत मिंधे गट, भाजपशी युती करू नये.
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या चारपैकी तीन स्तंभाची वाट लागली. आता अपेक्षा फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. पत्रकारांच्या हातात कलम असावे पण आजकाल काही पत्रकारांच्या हातात कमळ आहे. न्यायदेवतेच्या पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्रासमोर झालेले वस्त्रहरण वेगळे. न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण होणार नाही.उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणजे देश तर भारतमाता कुठे आहे. गावागावात जावून आम्हाला मत कशासाठी हवे हे कशासाठी सांगायचे. निवडणूक घेण्याची त्यांची हिंमत नाही. लोकशाही टिकायची असेल तर सामान्यांना धाडसाने पुढे यावे लागेल. जे विकले गेले त्यांना मी थांबवू कशाला. मला विकावू नको विश्वासू माणसे हवे.उद्धव ठाकरे म्हणाले, कुणी कसे म्हणेल मी तशी भुूमिका घ्यायची एवढी लाचारी मी घेणारा नाही. हे सत्य आहे. भाजप अन्याय करीत आहे हे सांगणारे सध्याचे मुख्यमंत्रीच होते आणि त्यांच्यासोबत जाताना काॅंग्रेस राष्ट्रवादी अन्याय करते हे सांगणारेही तेच आहेत.उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारची समर्थनिय भूमिका आम्हाला नव्हती. ते फक्त हातोडा मारायलाच बसले होते. माझ्यासारख्या माणसाला नेता म्हणून स्वीकारले हे राष्ट्रवादी – काॅंग्रेसचे मोठेपण आहे. केंद्रासारखी महाशक्ती मागे असल्यानंतर राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, पंचामृतातील काही शिंतोडे तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर शिंपडायला हवे होते. गतीमान सरकार म्हणता आणि काच फुटलेल्या एसटीतून महिलांना 50 टक्के सवलत दिली फक्त फिरवणारच का त्यांचे कुटुंब चालेल यासाठी प्रयत्न करा.उद्धव ठाकरे म्हणाले, उज्वला योजना चांगली आहे पण ती आता चालू आहे का. गॅस सिलेंडर मिळतो का. ते मिळण्याऐवढे पैसे द्यायला परवडत आहे का? जे खरे नाही ते खरे सांगणे तेच त्यांचे काम. आम्हालाही ते बदनाम करीत आहेत. कोरोनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात आम्ही काही केले नाही. समाधान हेच की, राज्यात एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही.उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचा त्यांनी वापर केला. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची निती. ते मुफ्तींसोबत गेले तेव्हा त्यांनी काय सोडले आणि आम्हाला हिंदुत्व सोडले असे म्हणता. भाजपचे दोन खासदार होते. सत्ता आज त्यांच्या उंबरठ्यावर येऊन थांबली. अडवाणी पंतप्रधान होऊ शकत होते पण सेक्युलर चेहऱ्याची मागणी झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. अर्थात तेव्हा सेक्युलरही ते होते.