१ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएलच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत

Date:

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) ने ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, दि. १ नोव्हेंबर २०२६ पासून ६० वर्षे व त्यावरील नागरिकांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत लागू करण्यात येणार आहे. ही सवलत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पीएमपीएमएलच्या बससेवेस लागू राहणार आहे.

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर ही योजना लागू करण्यात येत असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक बससेवा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी पीएमपीएमएलकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक पास रु. ७० दराने उपलब्ध होता. त्यावर ५० टक्के सवलत देऊन रु. ३५ इतक्या दरात ज्येष्ठ नागरिक दैनिक पास योजना सुरू करण्यात आली होती. आता त्यासोबतच सर्व बसमार्गांवरील प्रवास तिकीटभाड्यातही ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा पुरावा जवळ बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा पीएमपीएमएलचे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच आधारकार्डवर पूर्ण जन्मतारीख असणे अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासात आर्थिक दिलासा मिळणार असून, पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक सेवेला अधिक प्राधान्य मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमपीएमएलने सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा सादर

दुष्काळ व पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात जलसंधारण कामांना गती पुणे,...

पुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून आढावा

नोव्हेंबरअखेर बृहद् आराखडा केंद्र शासनाकडे सादर करणार; पहिल्या टप्प्यात...

मुलींच्या घटत्या जन्मप्रमाणाची कारणे शोधा; गर्भलिंग निदानाच्या दलालांवर सीसीटीव्हीची नजर!

लातूरच्या आढावा बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश; जन्मलिंग...

पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना बोनस; पाच वर्षांत अतिरिक्त रक्कम २७ हजारांवरून ३५ हजारांवर!

पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णयाला हिरवा कंदील; दरवर्षी दोन हजार रुपयांची...