पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर करू नये; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

Date:

पुणे, दि. २७ : रॅपिडो (Rapido) कंपनीने पुणे जिल्ह्यात बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ॲग्रीगेटर परवाना प्राप्त केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवान्याविना बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत संबंधित कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेसाठी असलेल्या भ्रमणध्वनीवरील अनुप्रयोगाचा वापर करू नये, असे आवाहन पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

रॅपिडो कंपनीने बाइक टॅक्सी सेवेसाठी पुणे जिल्ह्याकरिता आवश्यक एकत्रीकारक परवाना घेतलेला नसतानाही पुणे शहरात व्यवसाय सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राधिकरणाचे सदस्य, अन्य कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच स्वयंचलित रिक्षा व विद्युत दुचाकी टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत संबंधित कंपनीने विद्युत दुचाकी टॅक्सी एकत्रीकारक परवाना प्राप्त होईपर्यंत पुणे जिल्ह्यात विनापरवाना सुरू केलेली बाइक टॅक्सी सेवा तातडीने पूर्णपणे बंद करावी, असे निर्देश देण्यात आले होते. तसेच विनापरवाना बाइक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध पोलिस विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यानंतरही रॅपिडो कंपनीने बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कंपनीविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी व पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड वायुवेग पथकाने रॅपिडो ॲपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई करून एकूण ५६ हजार रुपये दंड आकारला आहे. तसेच संबंधित कंपनीचा अनुप्रयोग बंद करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागामार्फत सुरू आहे.

दुचाकी वाहनमालकांनाही सूचना

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी रॅपिडो बाइक टॅक्सी अनुप्रयोगाचा वापर करू नये. तसेच दुचाकी वाहनमालकांनी आपली खासगी दुचाकी या अनुप्रयोगावर नोंदवून बाइक टॅक्सी सेवेसाठी उपलब्ध करून देऊ नये. तपासणीदरम्यान अशा प्रकारे खासगी दुचाकी वाहनाचा वापर होत असल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदी व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी विनापरवाना बाइक टॅक्सी सेवेचा वापर करू नये तसेच संबंधित अनुप्रयोगावर आपल्या दुचाकी वाहनाची नोंदणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इंडसइंड जनरल इन्शुरन्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शरद माथूर यांची नियुक्ती

वैधानिक मंजुरीनंतर नियुक्तीची घोषणा; विमा आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील...

नागपुरात पहिल्या लक्झरी गोल्फ कोर्स टाउनशिपची घोषणा; २,१०० कोटींच्या संभाव्य महसुलाचा अंदाज

क्रिसाला डेव्हलपर्स आणि ‘एलेव्हा बाय हिरानंदानी कम्युनिटीज’ यांचा संयुक्त...

पुण्यात मतपेट्यांच्या सीलवरून आक्षेप; काही काळ थांबलेली विधान परिषदेची मतमोजणी पुन्हा सुरू!

पुणे शिक्षक मतदारसंघातील आठ मतपेट्यांच्या सीलवरून वाद; निवडणूक अधिकाऱ्यांच्या...