विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे

Date:

पुणे, दि. १५ : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, पुणे आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, ‘डिजिटल डिटॉक्स’ संकल्पना अंगीकारावी आणि समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती संवेदनशीलतेची शपथ देण्यात आली. तसेच ‘सेवा माझे योगदान’, आभार व संकल्पाची मानवी रांगोळी आणि समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांविषयी विशेष कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि संस्थेचे संचालक डॉ. राजेश जालनेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजकल्याण निरीक्षक शहागडकर यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

महामानवांकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवन उज्वल करावे असे सांगून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि समाजहितासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास श्री. लोंढे यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित...

आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पत्र्याच्या खोलीत ! महापौरांच्या अचानक पाहणीत अमराळे दवाखान्यातील गैरव्यवस्थापन उघड

शिवाजीनगरच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ला महापौर मंजुषा नागपुरेंची अचानक भेट;...

धर्म आणि विज्ञानाचा समन्वय साधणारे संशोधक राष्ट्रपती म्हणजे डॉ. कलाम

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे मत; डॉ. ए....

महापौर निवासस्थानी नवरात्री निमीत्त रंगला भोंडला आणि कन्यापूजन

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संवेदनशीलतेचा उपक्रम;...