पानिपत-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची अत्यंत महत्त्वाची बैठक आजपासून हरियाणामध्ये सुरू होत आहे. 12 ते 14 मार्च दरम्यान चालणारी ही तीन दिवसीय बैठक पानिपतच्या समालखा भागात होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसच्या प्रमुख नेत्यांची ही शेवटची बैठक आहे.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत चार दिवसांपूर्वीच समलखा येथे पोहोचले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून ते समालखा भागातील पट्टिकल्याण गावात ज्या ठिकाणी या बैठकीसाठी खास बनवलेल्या केंद्रात आहेत. या ठिकाणी संघाच्या प्रमुख चेहऱ्यांशी विचारविमर्श सुरू आहे. त्यादृष्टीने संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम करणारे काही चेहरे बदलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय RSS मधील काही लोकांच्या जबाबदाऱ्या बदलण्याचा निर्णयही यात घेतला जाऊ शकतो.
2025 मध्ये आरएसएसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, शताब्दी वर्षावर प्रतिनिधी सभेत विशेष चर्चा होणार आहे. सन 2025 पर्यंत नवीन लोकांना RSS शी जोडण्याचे लक्ष्य समोर ठेवून 2023-24 या वर्षासाठी कार्य योजना तयार करण्यावर चर्चा होणार आहे.