पुणे-पुण्यातील स्वारगेट परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 199 चे कलम 3 (1),3 (2), 3 (4) अंतर्गत कारवाई केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे. पाेलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली माेक्का अंर्तगत झालेली ही 16 वी कारवाई आहे.स्वारगेट व आजूबाजूच्या भागात दराेडा, जबरी चाेरी, खंडणी, हफ्ता गाेळा करणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठीसह खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, मुलींची छेडाछाड काढणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे या टाेळीवर दाखल आहेत.
टाेळी प्रमुख सचिन परशुराम माने (वय-24,रा.गुलटेकडी,पुणे) , निखील राकेश पेटकर (22,रा.बिबवेवाडी,पुणे), राेहित मधुकर जाधव (27), अजय प्रमाेद डिखळे (24), यश किसन माने (18), अमर तानाजी जाधव (23), विजय प्रमाेद डिखळे (18), माेन्या ऊर्फ सुरज सतिश काकडे (26, सर्व रा.गुलटेकडी,पुणे) व एक विधीसंघर्षित बालक आणि इतर चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या आरोपींनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागील काळात केले असल्याने त्यांना सन 2021 मध्ये एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले हाेते. परंतू त्यातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले साथीदार एकत्र करत खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे गुन्हे करत जबरदस्तीने दहशत करुन हप्ते वसुली केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा एकचे सहाय्यक पाेलिस आयुक्त सुनिल पवार करत आहेत.
ही कारवाई पाेलिस आयुक्त रितेश कुमार, सहपाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पाेलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ दाेन पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनिल पवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस अशाेक इंदलकर, साेमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, पीएसआय अशाेक येवले, प्रमाेद कळमकर, पाेलिस अंमलदार विजय खाेमणे, सुनिता आआंधळे, अनिस शेख, एस गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.