देशातील पहिल्या एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर (LNG) चालणाऱ्या रेल्वे गाडीला दाखवला हिरवा झेंडा

Date:

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात 1,472 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात झाले. यावेळी शाह यांनी देशातील पहिल्या एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावर (LNG) चालणाऱ्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवानाही केली. रेल्वे गाड्यांच्या WAG-12 इंजिनांच्या देखभालीसाठी उभारलेल्या केंद्राचेही शाह यांनी उद्घाटन केले.

यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केले. आज साबरमती विभागाअंतर्गत  पर्यावरणीय शाश्वतता, प्रवासी सुविधा आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षेवर भर असलेल्या अनेक रेल्वे प्रकल्पांचा प्रारंभ केला असल्याची माहिती त्यांनी दिली. साबरमती ही सत्याग्रह, साधे राहणीमान, ग्रामविकास आणि खादी असे सर्व प्रयोग प्रत्यक्ष अमलात आणणारी भूमी आहे असे ते म्हणाले.

आज 12,000 अश्वशक्तीच्या ट्विन-सेक्शन क्षमतेचे इंजिन प्रत्यक्ष वापरात आणले असल्याचेही त्यांनी सांगितले. या इंजिनामुळे एकाच वेळी तब्बल 600 ट्रकइतक्या मालाची वाहतूक केली जाऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी अशा कामासाठी दोन इंजिनांची आवश्यकता असायची, परंतु आता एकच WAG-12 इंजिन हे काम करू शकते असे ते म्हणाले. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे ते म्हणाले. आजपासून प्रत्यक्षात धावू लागलेली एलएनजीवर आधारीत रेल्वे गाडी आगामी काळात पर्यावरण संवर्धनात अत्यंत महत्त्वाचे योगदान देईल ही बाबही त्यांनी नमूद केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी तरुणाला थोबाडीत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

AAPचा आरोप – रस्त्याच्या दर्जा आणि कथित भ्रष्टाचाराबाबत प्रश्न...

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार दोन दिवसांत ठरणार,महायुतीत दोन्ही जागांसाठी रस्सीखेच

पुणे-महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या...

गणेशोत्सवानंतर ४८ तासांत रस्ते मोकळे करा; मांडव, कमानी, फ्लेक्स आणि रथ हटवण्याची मागणी

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर आता...

निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवावे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत 'द इंडियन एक्सप्रेस'...