महिलांच्या नेतृत्वातून घडलेला अनोखा गणेशोत्सव; ‘सिद्धीचा गणपती’ची राज्यभरात चर्चा

Date:

पुणे : भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड, परंपरेला आधुनिक विचारांची साथ आणि महिलांच्या संघटनशक्तीला कर्तृत्वाची दिशा देत बावधन येथील ‘सिद्धीचा गणपती महिला मंडळ’ने गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्णपणे महिलांकडून संचालित असलेले हे मंडळ आपल्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे राज्यभरात चर्चेत आहे.

संस्थापक अध्यक्षा पीयूषा किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल सुरू असून, गणेशोत्सवाला केवळ धार्मिक उत्सव न ठेवता त्याला सामाजिक आणि व्यावसायिक व्यासपीठाचे स्वरूप देण्यात आले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिला एकत्र येत हा उत्सव साजरा करतात.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मंडळाने महिला उद्योजकांचा स्वतंत्र ग्रुप उभारला असून, त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला सहभागी आहेत. परस्परांच्या व्यवसायांना व्यासपीठ देत नव्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून केले जाते. यासोबतच आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीही जपली जाते.

सिद्धीच्या गणपतीची आणखी एक विशेष ओळख म्हणजे पारंपरिक वादनातून होणारा गणेशोत्सव. डीजेचा वापर न करता पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा केला जातो. गणपतीची प्रतिष्ठापना करताना मिरवणूक काढली जात नाही आणि विसर्जनाच्या वेळीही मिरवणुकीचा आग्रह धरला जात नाही. पर्यावरणपूरक भूमिकेतून गणेशमूर्तीचे विसर्जन न करता तिचे दान केले जाते.

या वेगळ्या कार्यपद्धतीची दखल घेत सलग तीन वर्षे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘मोरया पुरस्काराने’ मंडळाचा गौरव झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांची आणि संकल्पनांची दखल घेत दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळाला भेट देतात. अमृता फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, खासदार मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबदादा पाटील दानवे, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, सिंबायोसिस च्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, अभिनेते प्रविण तरडे, स्नेहल तरडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिद्धीच्या गणपतीला भेट देत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

भक्ती, महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक विचार यांचा सुंदर मेळ घालत ‘सिद्धीचा गणपती महिला मंडळ’ने गणेशोत्सवाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच सिद्धीचा गणपती हा केवळ उत्सव न राहता महिलांच्या सामूहिक कर्तृत्वाची आणि सामाजिक सहभागाची ओळख बनत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

IIT मुंबईतील साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण; प्रा. दुल्ला यांना तत्काळ अटक करण्याची युवक काँग्रेसची मागणी

राहुल गांधींचा साहिलच्या पालकांशी संवाद; निष्पक्ष चौकशीची मागणी करत...

गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर १२० जीवरक्षक, ३९० CCTV कॅमेऱ्यांची नजर

विसर्जन घाट, कृत्रिम हौद, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन आणि आपत्कालीन...

मुख्य निवडणूक आयुक्तांनी ४८ तासांत राजीनामा द्यावा; अन्यथा देशव्यापी आंदोलनाचा CJPचा इशारा

SIR प्रकरणावरून अभिजीत दीपके यांचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप;...

भारताला २०३२ च्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद; पुण्याची ऐतिहासिक बाजी

• पुणे ग्रँड टूरच्या यशाच्या बळावर पुणे २०३२ च्या...