पुण्यात पाच घरफोड्यांचा छडा; आरोपीकडून १६ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

Date:

विश्रामबाग पोलिसांची कारवाई; टिळेकरनगर येथून ३४ वर्षीय आरोपी ताब्यात

पुणे : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना विश्रामबाग पोलिसांनी पाच गुन्ह्यांचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात फिर्यादी घरी नसताना अज्ञात आरोपीने घराचा दरवाजा तोडून चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

तपासादरम्यान पोलीस हवालदार नितीन मुंढे आणि पोलीस अंमलदार अनिस शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी टिळेकरनगर-येवलेवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव जगदीशसिंग नमनसिंग कलानी (वय ३४, रा. टिळेकरनगर, कोंढवा, पुणे) असे आहे. चौकशीदरम्यान त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पुढील तपासात त्याच्याकडून पुणे शहरातील एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणांमध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, भारती पोलीस ठाण्यातील एक आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. आरोपीकडून या गुन्ह्यांशी संबंधित १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताला २०३२ च्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद; पुण्याची ऐतिहासिक बाजी

• पुणे ग्रँड टूरच्या यशाच्या बळावर पुणे २०३२ च्या...

संभवामि युगे युगेचा प्रत्ययकारी प्रयोगाला हाऊसफुल प्रतिसाद

पुणे – श्रीकृष्णचरित्राचे, या चरित्रातील विविध प्रसंगांचे दर्शन नृत्य-नाट्याच्या...

माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचे निधन

पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता...

पेझेश्कियान यांच्या UN भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे:अमेरिकेच्या निर्बंधांचा गरिबांवर परिणाम

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनात इराणचे राष्ट्राध्यक्ष...