संभवामि युगे युगेचा प्रत्ययकारी प्रयोगाला हाऊसफुल प्रतिसाद

Date:

पुणे – श्रीकृष्णचरित्राचे, या चरित्रातील विविध प्रसंगांचे दर्शन नृत्य-नाट्याच्या माध्यमातून घडविणारे संभवामि युगे युगे हे अतिशय प्रत्ययकारी सादरीकरण बुधवारी रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सादर झाले आणि पूर्णपुरुष मानले जाणाऱ्या या अवतारकार्याचे सर्वश्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संस्कृती बालगुडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले, त्यांनीच दिग्दर्शित तसेच अभिनित केलेले संभवामि युगे युगे हे नृत्यनाट्य यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भरगच्च प्रेक्षागृहाने अक्षरशः डोक्यावर घेतले. पायात व्याधबाण घुसलेला श्रीकृष्ण स्वतःच आपल्या अवतारकार्याची प्रेरणा, आवश्यकता आणि अपरिहार्यता प्रेक्षकांसमोर ठेवतो, या प्रसंगातून सुरू झालेले हे नृत्यनाट्य फ्लॅशबॅक तंत्राने बालकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवत कंसवध, राधेसोबतचे हळवे, नाजुक क्षण दर्शवत योगेश्वर श्रीकृष्णापर्यंतचा प्रवास सांगणारे होते. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग, कृष्णशिष्टाई अयशस्वी होणे, युद्धाचा निर्णय, गीतोपदेश, भीष्म-द्रोण-कर्ण-दुर्योधनवधाचे प्रसंग, गांधारीचा शाप आणि यादवांचा वंशनाश असे टप्पे घेत पुन्हा पायात बाण घुसलेल्या श्रीकृष्णापर्यंत वर्तुळ पूर्ण करताना प्रेक्षक भारावून गेले होते.

पण ते तिथेच थांबले नाही. तर यदा यदा हि धर्मस्य…या वचनाची पूर्तता करण्यासाठी मी पुन्हा अवतार धारण करेन, इथपर्यंत प्रेक्षकांना घेऊन गेले. मानवी जीवनातील आशानिराशा, महत्त्वाकांक्षा, सत्तालालसा, कुटीलता, नैतिक अनैतिकतेचे अर्थ, जय पराजयाच्या संकल्पना…सगळ्यांचे काल व परिस्थितीसापेक्ष विश्लेषण मांडणारे हे नृत्यनाट्य प्रेक्षकांना अंतर्मुख करणारेही होते.

या प्रयोगाला मोहन टिल्लू, संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, सचिन साळुंके, सचिन आडेकर, अतुल गोंजारी, श्रीकांत कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. नृत्यनाट्यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, मदतनीसांचा या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सहनिर्माते केदार सोमण, सूत्रधार व निर्मिती व्यवस्थापक निखिल निगडे, संगीत दिग्दर्शक तन्मय भिडे व ऋतुराज साठे, संगीत संयोजक विवेक वनारसे, प्रकाश योजनाकार तेजस देवधर, केशभूषाकार शीतल पळसांडे, नृत्यनाट्याच्या दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक तसेच संकल्पना, सहनिर्मात्या, प्रमुख अभिनेत्री संस्कृती बालगुडे, विद्या दिढे, रिचा बापट, तितली घोटक, नक्षत्रा कुलकर्णी, स्पृहा कुलकर्णी यांचा समावेश होता.

संस्कृती बालगुडे म्हणाल्या, ‘या हाऊसफुल प्रतिसादाबद्दल मनापासून आभार व्यक्त करते. या प्रयोगाचे यश प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अवलंबून आहे कारण भरतनाट्यम नृत्यशैलीच्या माध्यमातून सादर होणारे हे नृत्यनाट्य आहे. पण याची रचना कल्पकतेने केल्याने ते छोट्यांना आणि मोठ्यांनाही सहज समजणारे आहे. कार्यक्रमास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात पाच घरफोड्यांचा छडा; आरोपीकडून १६ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

विश्रामबाग पोलिसांची कारवाई; टिळेकरनगर येथून ३४ वर्षीय आरोपी ताब्यात पुणे...

माजी नगरसेवक विनोद वस्ते यांचे निधन

पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता...

पेझेश्कियान यांच्या UN भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे:अमेरिकेच्या निर्बंधांचा गरिबांवर परिणाम

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनात इराणचे राष्ट्राध्यक्ष...

UN मध्ये मृत मुलांचे फोटो दाखवत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेवर हल्लाबोल

पेझेश्कियान म्हणाले — “आम्हाला दहशतवादी म्हटले जाते, पण आम्हीच...