यूपीआय एमडीआर: 15 ऑक्टोबरपूर्वी तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे

Date:

यूपीआय एमडीआर: ग्राहक आणि व्यापाऱ्यांना काय माहित असणे आवश्यक आहे

यूपीआय ग्राहकांसाठी मोफतच राहणार आहे. एमडीआर म्हणजे ग्राहकाकडून कार्ड किंवा डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यापाऱ्याने भरायचे शुल्क. निवडक यूपीआय व्यापारी व्यवहारांवर हे शुल्क लागू करण्यात आले आहे.

याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल:

  • यूपीआय ग्राहकांसाठी मोफतच राहणार आहे
  • यूपीआय द्वारे कुटुंबीय आणि मित्रांना पैसे पाठवणे पूर्णपणे मोफत राहील.
  • यूपीआय द्वारे कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही रकमेचे पेमेंट करणे मोफत राहील.
  • तुम्ही दुकानातून खरेदी करत असाल, स्थानिक बाजारात पेमेंट करत असाल किंवा रस्त्यावरील विक्रेत्याच्या QR कोडवर स्कॅन करून पेमेंट करत असाल ते मोफतच राहील.
  • व्यापारी एमडीआर चा भार ग्राहकांवर टाकू शकत नाहीत.

याचा व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल:

  • 2,000 रु. पर्यंतच्या सर्व यूपीआय व्यापारी पेमेंटवर शून्य एमडीआर किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचे 96% व्यवहार मोफत राहतील.
  • यूपीआय QR कोडद्वारे आपल्या बँक खात्यांमध्ये दरमहा 1 लाख रु. पर्यंत रक्कम प्राप्त करणारे रस्त्यावरील विक्रेते, परिसरातील दुकानदार आणि लघु व्यावसायिक यांसारखे छोटे व्यापारी शून्य MDRचा लाभ घेत राहतील.
  • 2,000 रु.  पेक्षा अधिक रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर 0.4% एमडीआर आकारला जाईल.
  • 75,000 रु. आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी एमडीआर प्रति व्यवहार 300 रु. इतका मर्यादित असेल.

आवश्यक सेवांसाठी विशेष एमडीआर दर कोणते आहेत:

  • 2,000 रु. पेक्षा कमी रकमेच्या पेमेंटवर शून्य एमडीआर कायम राहील.
  • इंधन, शिक्षण, विमा, रेल्वे, दूरसंचार आणि युटिलिटी सेवा (वीज, पाणी आणि पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू) यांसह इतर सेवांसाठी 2,000 रु. पेक्षा अधिक रकमेच्या पेमेंटवर प्रति व्यवहार 5 रु. इतका निश्चित एमडीआर आकारला जाईल.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गंगा नेब्युला सोसायटीमध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा

‘गीता सार’ आणि ‘काकोरी ट्रेन ॲक्शन’च्या नाट्यरूपांतराने वेधले लक्ष;...

UPI वर कोणाला GST द्यावा लागेल, कोणाला सूट?: संपूर्ण रकमेवर की फक्त MDR शुल्कावर 18% कर आकारला जाईल, जाणून घ्या

ग्राहकांसाठी UPI मोफतच; ₹2,000 पेक्षा मोठ्या काही व्यापारी व्यवहारांवरील...

पेट्रोल पंपांवर ₹2,000 पेक्षा जास्त UPI पेमेंटवर फक्त ₹5 MDR; ग्राहकांसाठी व्यवहार मोफतच

इंधनाचे बिल ₹2,500 असो वा ₹10,000; पेट्रोल पंप चालकासाठी...

पुण्याचा गणेशोत्सव पाहून मन भरून आले; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडून परंपरेचे कौतुक

मानाच्या गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे घेतले दर्शन; डीजे,...