‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे मोफत आरोग्य शिबिर

Date:

११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप – विविध रुग्णालयांचा सहभाग

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांत नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच दंत उपचारांशी संबंधित तपासण्या करण्यात येणार असून गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमात विविध नामांकित रुग्णालये आणि संस्थांचा सहभाग आहे. अपोलो हॉस्पिटलच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे १७ ते २० सप्टेंबरदरम्यान नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. संचेती हॉस्पिटलच्या वतीने २१ सप्टेंबरला फिजिओथेरपी तपासणी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी तसेच २२ सप्टेंबरला इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी आणि डॉ. विजय माब्रुकर यांच्या सहकार्याने दंत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. मॉडर्न कॉलेजच्यावतीने २२ सप्टेंबरला तर ढोले पाटील यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबरला फिजिओथेरपी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या मंडपात होणार असून अधिकाधिक गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध तपासण्यांमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेता येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.

“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच उद्देशाने यंदा विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचाराबाबत सल्ला मिळणार आहे. विशेषतः गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने हा आरोग्योत्सव होत असून ट्रस्टचे हे सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील.”

  • पुनीत बालन
    (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
    )
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

७ दिवसांपासून शाळा-बाजार बंद, लोक घरात कैद; साखर ₹४५० किलो, ४ दिवसांत कुकी समुदायाच्या ६ जणांची हत्या

मणिपूरमध्ये कुकी-नागा संघर्ष तीव्र इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी-झो आणि नागा...

‘आम्ही कॅनडावर राज्य करू’; लॉरेन्स टोळीच्या धमकीचे पत्र समोर

कॅनडात ५ हजार सदस्य असल्याचा टोळीचा दावा; ‘$1,000 साठी...