पुणे , दि 09 मार्च 23
प्रकाशन विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘पुणे बुक फेअर 2023’ मध्ये एक विक्री दालन थाटण्यात आले आहे. क्रिएटीसीटी मॉल (ईशान्य मॉल), एअरपोर्ट रोड, येरवडा येथे 9 मार्च ते 12 मार्च 2023 या कालावधित सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रकाशन विभागाचे विक्री दालन सर्वासाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनादरम्यान भारत सरकारच्या प्रकाशन विभागाची विविध पुस्तके किमान 10 ते कमाल 90 टक्क्यापर्यंत सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगरे यांनी दिली.
प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा, गांधी साहित्य, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे यांचा विपुल संग्रह प्रकाशन विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.