पुणे- आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) पुणे यांचे वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार २०२३’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. २०२३ चा पुरस्कार अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दाखल घेऊन जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. प्रमिला गायकवाड या अविरतपणे बहुजन समाजातील गरजू, होतकरू विद्यार्थ्याचे केवळ गरीब परिस्थिती अथवा फी अभावी शिक्षण थांबता कामा नये, किंवा असे विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडू नये या साठी कार्य करत आहे. याचा कार्याची दखल घेऊन आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI) पुणे यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. समाजभूषण स्व.उत्तमराव पाटील यांचा वारसा लाभलेल्या सौ. प्रमिला गायकवाड यांना कार्यामध्ये यजमान माजी न्यायाधीश ॲड. भागवतराव गायकवाड व कुटुंबीय यांचे मदत झाली.