लक्ष्मीनगर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई; 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; सहा गुन्हे उघड
पुणे : बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तसेच रोकड चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील सहा महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला पुणे पोलिसांच्या लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी महिलांकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि 10 मोबाईल फोन असा सुमारे 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईत पुणे शहरातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांमधील मुद्देमाल आणि अनोळखी महिला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना तपास पथकाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे, तसेच पोलीस अंमलदार सुरज आंबासे, किरण भागीत आणि अतुल जाधव यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आरोपी ये-जा करत असलेल्या सुमारे 50 किलोमीटरच्या मार्गावरील 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी महिलांचा माग काढण्यात आला.
त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी या महिला संगमवाडी पार्किंग क्रमांक 3 येथे मध्यप्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिला पोलीस अंमलदार धनश्री साबळे, वर्षा तळेकर आणि ऐश्वर्या बनसोडे यांच्या मदतीने सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये निशा शांतनू सिसोदिया (वय 30), रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश; प्रिया वाईफ ऑफ आसिक सिसोदिया (वय 34), रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश; पुनम प्रदिप सिसोदिया (वय 27), रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश; वर्षा कमल सिसोदिया (वय 35), रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश; आसना रघुवीर सिसोदिया (वय 32), रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश आणि सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय 37), रा. जाटखेडी, गुलखेडी, थाना बोडा, तहसील पचोर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.
या महिलांकडे चौकशी केल्यानंतर सोन्याचे दागिने, रोकड आणि 10 मोबाईल फोन असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला. या कारवाईत लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील दोन, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील दोन तसेच विश्रांतवाडी आणि लष्कर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे आणि पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जेतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे, पोलीस अंमलदार श्रीनाथ कांबळे, गणेश लोखंडे, किरण भागीत, मयूर सूर्यवंशी, सुरज आंबासे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भिमराव कांबळे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, अमोल वायाळ, अक्षय शिंदे, सचिन कुटेकर, तसेच महिला पोलीस अंमलदार धनश्री साबळे, वर्षा तळेकर आणि ऐश्वर्या बनसोडे यांनी केली आहे.

