डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर

Date:

पुणे, दि.३१: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर, येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी निर्गमित केले आहेत.या आदेशान्वये डेक्कन वाहतूक विभाग अंतर्गत आपटे रोड येथील धनराज सोसायटी गेट समोर दोन्ही बाजूस मिळून ५० मीटर, कमला नेहरू पार्कच्या मुख्य गेटच्या समोर दीडशे मीटर, आपटे रोड येथील भाऊसाहेब शेळके पथ मनीषा अपार्टमेंट समोर दोन्ही बाजूस २० मीटर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.

सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन

जय श्री आई माता किचन वेअर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे दोन्ही बाजूस १५ मीटर, नऱ्हे येथील महाराष्ट्र बँक चौकातील मल्हारगड सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर २० मीटर नो पार्किंग झोन आहे.

कोथरूड वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन

साम्राज्य बळवंतपुरम सोसायटी गेट नंबर १ व गेट नंबर २ च्या दोन्ही बाजूस भिंतीलगत १० मीटर दरम्यान तसेच मातोश्री आश्रम कडून गिरिजा चौकातून डावीकडील दोन्ही बाजूस २५ मीटर, डीपी रोडवरील पंडित फार्म गेट क्रमांक १ ते ३ दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.

येरवडा वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन

विश्रांतवाडी ते एअरपोर्ट या मार्गावर सिद्धेश्वर चौक ते केकाण पेट्रोल पंप पर्यंत रोडच्या डाव्या बाजूस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी समांतर पार्किंग करण्यात येत आहे. तसेच ५०९ चौकाकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर चौक पर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.

चंदननगर वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन

चंदननगर वाहतूक विभाग अंतर्गत गंगा अल्टस सोसायटी समोरील रस्त्यावर डाव्या बाजूस १०० मीटर व उजव्या बाजूस ५० मीटर नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. विश्रामबाग वाहतूक विभाग अंतर्गत मौजे गोपाळ गायन समाज बिल्डिंग व लिमये होम या दोन्ही इमारती समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूस १५ मीटर, राधा स्वामी सत्संग ते नाबार्ड सोसायटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी-१ पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी काही सूचना असल्यास १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन डॉ. भाजीभाकरे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश

पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक...

‘DJच्या वादात पडू नका; सांस्कृतिक गणेशोत्सव कसा असतो हे पुणेकरांनी दाखवून द्यावे’ – मुख्यमंत्री फडणवीस

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यातील बैठकीत विरोधकांवर हल्लाबोल; ‘लाल संविधानाच्या...