पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगांसाठी अधिक सुलभ होणार

Date:

पुणे महापालिका–RampMyCity यांच्यात सामंजस्य करार; पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी रॅम्प

पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच हालचालींमध्ये अडचण असलेल्या नागरिकांसाठी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि RampMyCity यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील ५० सार्वजनिक ठिकाणी व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी रॅम्प बसविण्यात येणार असून, या कामासाठी Bajaj Finservच्या CSR निधीतून सहकार्य केले जाणार आहे.

या रॅम्पमुळे महापालिका कार्यालये, सांस्कृतिक स्थळे, उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी व्हीलचेअर वापरणाऱ्या नागरिकांना सहज प्रवेश करता येणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि चालताना अडचण येणाऱ्या व्यक्तींनाही या सुविधेचा लाभ होणार आहे.

हा उपक्रम ‘Building a Purple Pune’ या संकल्पनेअंतर्गत राबविला जात असून, शहरातील प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक ठिकाणे समान आणि सहजपणे वापरता यावीत, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी रॅम्प उभारल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये दिव्यांग नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी भेडसावणारे इतर अडथळे दूर करण्यासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पात पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक सुविधा, RampMyCityचे तांत्रिक ज्ञान आणि Bajaj Finservचे CSR सहकार्य यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे.

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “शहरातील प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी समान आणि सहज प्रवेश मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि सन्मानाने शहरातील सुविधांचा वापर करता यावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.”

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास करताना दिव्यांग व्यक्तींच्या गरजांचा विचार होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. या उपक्रमामुळे पुण्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणे अधिक सुलभ होऊन शहर नागरिकांसाठी अधिक सोयीचे बनेल, असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, “दिव्यांगांसाठी सार्वजनिक ठिकाणे सुलभ करणे हा समावेशक पुणे घडविण्याचा महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमातून प्रत्यक्ष सुविधा निर्माण होत असून, भविष्यात अशा सुविधा शहरातील आणखी ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.”

Bajaj Finserv CSRच्या National Lead डॉ. अमनप्रीत कौर यांनी योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबीपणे वावरता येते, असे सांगत या उपक्रमाला सहकार्य करताना आनंद होत असल्याचे म्हटले.

RampMyCityचे संस्थापक प्रतीक खंडेलवाल म्हणाले की, ५० सार्वजनिक ठिकाणी रॅम्प बसवल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक सहज आणि सन्मानाने सार्वजनिक ठिकाणांचा वापर करता येईल. ही केवळ सुरुवात असून, भविष्यात शहरातील इतर अडथळेही दूर करून पुणे अधिक सुलभ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि हालचालींमध्ये अडचण असलेल्या नागरिकांसाठी अधिक सुरक्षित, सोयीची आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर या सुविधांचा विस्तार शहरातील आणखी सार्वजनिक ठिकाणी करण्याचे नियोजन आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘DJच्या वादात पडू नका; सांस्कृतिक गणेशोत्सव कसा असतो हे पुणेकरांनी दाखवून द्यावे’ – मुख्यमंत्री फडणवीस

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यातील बैठकीत विरोधकांवर हल्लाबोल; ‘लाल संविधानाच्या...

प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर संयुक्त कारवाई

कालठण नं. १ परिसरातील मांगूर माशांचे साठे नष्ट; संवर्धकांवर...

वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे- सहायक आयुक्त विशाल लोंढे

पुणे, दि. ३१: जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत मुला-मुलींची २६ वसतिगृहे...