दिनांक १० मार्च २०२३ पासून होणार कार्यवाही– संचालक मंडळाची मान्यता
पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा
१९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल
करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे
गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल
करण्यात येतो.
दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ
नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम
रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजीमान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/- दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.