स्पर्धा परीक्षा गट-क (२०२३) भरतीतील रिक्त पदांच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांना निवेदन;लोकसेवा आयोगाकडे पाठपुराव्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आश्वासन

Date:

पुणे.: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क (२०२३) स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करावी, या मागणीसाठी, सौदागर शेळके, किरण जगताप, राहुल पवार, राहुल सूर्यवंशी, निखिल घाटगे, आकाश काळे व शेखर भोसले या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात सन २०२३ मधीलगट-क लिपिक-टंकलेखक पदांच्या ७,००६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, अंतिम निवड प्रक्रियेनंतर खुल्या प्रवर्गातील अनेक पदे रिक्त राहिल्याचा दावा करण्यात आला. तसेच काही उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नसल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून, पात्र उमेदवार उपलब्ध असतानाही प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले.

याबाबत अनेक उमेदवारांनी न्यायालयातही धाव घेतली असून, आयोगाकडून उत्तर दाखल होण्यास विलंब होत असल्याने भरती प्रक्रिया रखडत असल्याचेही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. रिक्त पदे तातडीने भरावीत आणि रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करून पात्र उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी आवश्यक पाठपुरावा करून भरती प्रक्रियेबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात साताऱ्यात नागरिकांना दिलासा; डॉ. नीलम गोऱ्हेंकडून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

साताऱ्यात शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा.दि.२६: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन...

धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये घुसडविलेल्या अनैतिहासिक गोष्टी काढून टाका -संजय सोनवणी

मनुस्मृती वैदिक स्त्रीयांना अत्यंत हिणकस वागणूक देते हे वास्तव...