पुणे, दि. २५ जुलै : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत २४.१५ टीएमसी म्हणजे ८२.८६ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या चार धरणांमध्ये २३.९८ टीएमसी म्हणजे ८२.२७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत ०.१७ टीएमसी आणि ०.५९ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणात ६८५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून सांडव्यावरून ४ हजार ७०८ क्युसेक्स वेगाने विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत सांडव्याद्वारे एकूण २.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
नवीन मुठा उजवा कालव्यातून १ हजार ५४ क्युसेक्स, तर पुणे शहरासाठी ६०२ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
पानशेत धरणात ९.३० टीएमसी म्हणजे ८७.३२ टक्के, वरसगाव धरणात १०.४६ टीएमसी म्हणजे ८१.६० टक्के, तर टेमघर धरणात २.४२ टीएमसी म्हणजे ६५.२४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गेल्या २४ तासांत खडकवासला परिसरात १८ मिमी, पानशेत परिसरात ८४ मिमी, वरसगाव परिसरात ८० मिमी, तर टेमघर परिसरात सर्वाधिक ११७ मिमी पावसाची नोंद झाली. चारही धरणांमध्ये मिळून १ हजार ९५८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
धरणनिहाय स्थिती
| धरण | पाऊस | पाणीसाठा | टक्केवारी | आवक |
|---|---|---|---|---|
| खडकवासला | १८ मिमी | १.९७ टीएमसी | १००% | ६८५ क्युसेक्स |
| पानशेत | ८४ मिमी | ९.३० टीएमसी | ८७.३२% | ५३६ क्युसेक्स |
| वरसगाव | ८० मिमी | १०.४६ टीएमसी | ८१.६०% | ६०५ क्युसेक्स |
| टेमघर | ११७ मिमी | २.४२ टीएमसी | ६५.२४% | १३२ क्युसेक्स |

