दादा,तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांंच्या आक्षेपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना कोपरखळ्या मारल्या आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन डिवचलं आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी देशद्रोही असा शब्द वापरल्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही आणला होता. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशद्रोहाची मी सुरुवात केली नव्हती. पण अजित पवार मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्यांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला, त्यांच्यासोबत नवाब मलिकांनी व्यवहार केला. त्या नवाब मलिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणाला महाराष्ट्र द्रोही. तुम्ही म्हणता की हे घटनाबाह्य सरकार आहे, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधीपक्षनेता आहात का?शिंदे- फडणवीस सरकारने जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. दादा आपली मैत्री आहे पण तुम्ही कडवट शिवसैनिक बनू नका. दादा अडीच वर्षे वर्षावर कुणी जात नव्हते. फेसबुक लाईव्हवर सर्व सुरू होतं. 6 कोटी पर्सनल पीआर करायला खर्च केल्यात. आम्ही सकाळ आणि सामनासकट सर्वांना जाहिराती दिल्यात. घटनाबाह्य सरकार आहे पण जाहिराती चालतात. 70 हजार कोटी इरिगेशनवर खर्च केले पण एकही सिचन झाले नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, जबाबदार आहात. लोकशाहीत आम्ही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही.आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतयं. समृद्धा रोजगाराला मोठी चालना मिळीली. सरकारनं अनेक कामांना चालना दिली आहे. १२ हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. नियमात बदल करुन शेतकऱ्यांन दुप्पट मदत करण्यात आली आहे. नाफेडकडून कांदयाची खरेदी सुरु आहे. कांदा उत्पादकांच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे.ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरु केला. मविआ सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण आम्ही हा लढा ताकदीनिशी लढतोय.
गेल्या सरकारमध्ये दावोसमधून १० हजार कोटींचीही गुंतवणुक नाही. दावोसमध्ये ३०-३५ कोटींचा खर्च झाला. करार झालेल्या कंपन्यांना जागा देण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली. करारामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती.सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारची काम दिसत नाहीत. विरोधकांनी फक्त राजकीय भाष्य केलं.सहकार क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मदत करतायत.
गाडी बदलून कुठे गेलात?
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोकळ्या-ढाकळ्या शैलीत जोरदार भाषण ठोकले. ते म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सीएम रोडशो करतात, असे अजित पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांनी सभा घेतल्या. ग्रुपला बोलावले. तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता.
तिन्ही राज्य गेले
एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गेले. आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार आले. तुमचे मात्र, बेगाने शादी में अब्दुला दिवाना सुरू आहे. कसबा येथे चुका झाल्या आहेत. त्या आम्ही येणाऱ्या काळात दुरुस्त करू. आमच्या कामाने मते जिंकू. मात्र, येणाऱ्या काळात निवडणुकात आहेत. तुम्ही तिघे आहात. एकाची पार्टी उभी राहिली, तर दुसरा भजन करत बसेल का?
कामांची यादीच वाचली
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सरकारमध्ये दावोसमधून दहा हजार कोटींचीही गुंतवणूक नाही. मात्र, या वर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राचा उदो उदो सुरू होता. सरकारने अनेक कामांना चालना दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जनतेला फायदा होतो आहे. मेट्रोच्या दोन प्रकल्पांचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.