पुण्यात बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या; व्हिडिओमुळे खळबळ,सुसाईड नोटही-राजकीय पुढाऱ्यांवर आरोप

Date:

आर्थिक व्यवहारांबाबत अनेकांवर आरोप; पोलिसांकडून सुसाईड नोट, व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

पुणे | प्रतिनिधी

गुलटेकडी (डायस प्लॉट) परिसरातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असून काही व्हिडिओही रेकॉर्ड केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून सुसाईड नोट, व्हिडिओ आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या भागीदारी फर्ममार्फत बांधकाम प्रकल्प सुरू होता. या फर्ममध्ये काही व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे नातेवाईक भागीदार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भातील वाद न्यायालयात गेल्यानंतर प्रकल्प रखडला. त्यामुळे बँकेचे कर्ज आणि आर्थिक ताण वाढल्याचा उल्लेख तपासात समोर आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृताने सुसाईड नोट आणि व्हिडिओमध्ये काही व्यक्तींविरोधात आर्थिक व्यवहार, थकबाकी आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची सत्यता अद्याप तपासाअंती निश्चित झालेली नसून, संबंधितांची बाजू घेणे आणि पुरावे तपासणे सुरू आहे.

तसेच इतर काही बांधकाम प्रकल्पांतील आर्थिक व्यवहार, थकीत रक्कम आणि कथित फसवणुकीबाबतही सुसाईड नोटमध्ये उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व व्यवहारांची कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे.

पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करून पुढील तपास सुरू केला असून, सुसाईड नोट, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वेळेवर उड्डाणांमध्ये एअर इंडियाची जागतिक झेप; सिरियमच्या क्रमवारीत चौथे स्थान

जून 2026 मध्ये 86.23% वेळेवर उड्डाणे; 99.7% फ्लाइट पूर्णत्व...

महिंद्राच्या चाकण प्रकल्पातून 30 लाखावे वाहन; ‘BE 6’ ने गाठला ऐतिहासिक टप्पा

केवळ 27 महिन्यांत 10 लाख वाहनांचे उत्पादन; चाकण प्रकल्पाची...