कल्याण ज्वेलर्सची नवी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सारा अली खान

Date:


अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्या जोडीने आता सारा अली खानही बनणार ब्रँडचा चेहरा

पुणे | प्रतिनिधी

भारतातील आघाडीच्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने अभिनेत्री सारा अली खान हिची नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी ब्रँडशी जोडलेले अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्या प्रतिष्ठित यादीत आता सारा अली खानचाही समावेश झाला आहे.

कल्याण ज्वेलर्सने ही नियुक्ती देशभरातील विविध वयोगटांतील ग्राहकांशी अधिक प्रभावी नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे. आधुनिक विचार, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ यामुळे सारा अली खान आजच्या तरुण पिढीचे प्रभावी प्रतिनिधित्व करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आगामी काळात सारा अली खान कल्याण ज्वेलर्सच्या टेलिव्हिजन, डिजिटल, प्रिंट, आउटडोअर आणि इन-स्टोअर जाहिरात मोहिमांमध्ये झळकणार असून सण-उत्सव आणि विशेष प्रसंगांसाठीच्या दागिन्यांच्या संग्रहाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

कल्याण ज्वेलर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रमेश कल्याणरमन यांनी सांगितले की, “साराच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, साधेपणा आणि भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर दिसून येतो. त्यामुळे ती कल्याण ज्वेलर्सच्या मूल्यांशी पूर्णपणे सुसंगत आहे.”

यावेळी सारा अली खान म्हणाली, “गुणवत्ता, उत्कृष्ट कारागिरी आणि पारदर्शकतेमुळे कल्याण ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. या प्रतिष्ठित ब्रँडचा भाग होताना मला आनंद होत असून या नव्या प्रवासासाठी मी उत्सुक आहे.”

गेल्या तीन दशकांपासून ग्राहकांचा विश्वास जपणाऱ्या कल्याण ज्वेलर्सने या नव्या भागीदारीद्वारे पारंपरिक मूल्ये आणि आधुनिकतेचा समतोल अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीपीएस मोटर्सचा पुण्यात विस्तार; कॅम्पमध्ये महिंद्राचे नवे अत्याधुनिक शोरूम सुरू

ईस्ट स्ट्रीटवरील नव्या टचपॉइंटमुळे पुण्यातील महिंद्रा सुविधा केंद्रांची संख्या...

चिंचवडमध्ये अँपिअरचे नवीन एक्स्पिरियन्स सेंटर; पुण्यात EV विस्ताराला वेग

टेस्ट राइड, फायनान्स आणि विक्रीनंतरच्या सेवांसह इलेक्ट्रिक स्कूटरचा संपूर्ण...

दिवंगत वारकरी भोसलेंच्या मुलीच्या शिक्षणासाठी दरमहा 5 हजारांची वैयक्तिक मदत-पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय

⁠तिन्ही वारकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून दिला धीर दुःखाच्या प्रसंगी शासन...

कसबा भूमीत छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक: सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

स्मारकाच्या कामाचा आढावा आणि नियोजित आराखड्याची पाहणीरत्नागिरी, दि. 15...