नवीन फ्रँचायझी टीमसह पुनित बालन ग्रुपचा इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभाग

Date:

‘पीबीजी रेसिंग’च्या माध्यमातून भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये पदार्पण; पुण्याचे देशातील उदयोन्मुख मोटरस्पोर्ट हब म्हणून महत्त्व अधोरेखित

पुणे | प्रतिनिधी

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (ISRL) तिसऱ्या हंगामात पुनित बालन ग्रुपने (PBG) नवीन फ्रँचायझी टीमसह प्रवेश केला आहे. ‘पीबीजी रेसिंग’ या नवीन फ्रँचायझीच्या माध्यमातून पुनित बालन ग्रुपने भारतीय मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात पदार्पण केले असून, देशातील उदयोन्मुख क्रीडा परिसंस्थांचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे वाढते महत्त्वही यामुळे अधोरेखित झाले आहे.

प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि क्रीडा क्षेत्राचे पुरस्कर्ते पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील पुनित बालन ग्रुपने यापूर्वी क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्मरेसलिंग अशा विविध क्रीडा प्रकारांत गुंतवणूक केली आहे. आता सुपरक्रॉस रेसिंगमध्ये प्रवेश करत समूहाने आपल्या क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचा आणखी विस्तार केला आहे.

आयएसआरएलमध्ये पीबीजी रेसिंगचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील लीगचे स्थान अधिक भक्कम होण्यास मदत होईल. त्याचबरोबर भारतीय सुपरक्रॉसमध्ये क्रीडाप्रेमींचा नवा वर्ग जोडला जाण्याची आणि चाहत्यांसाठी सहभागाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मजबूत समुदाय उभारण्यासाठी खेळ हे प्रभावी माध्यम आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग भारतातील रेसिंग क्षेत्रातील नव्या पर्वाचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र आणि विशेषतः पुण्यातील उत्साही चाहते तसेच विकसित होत असलेल्या रेसिंग संस्कृतीमुळे पुणे देशातील सक्रिय मोटरस्पोर्ट हब म्हणून वेगाने उदयास येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“सीझन ३ साठी आयएसआरएलमध्ये सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय रेसिंगचा ध्यास, उत्कृष्ट कामगिरी आणि उत्साहाचे प्रतिबिंब असलेली फ्रँचायझी उभारण्यास आम्ही उत्सुक आहोत. देशातील मोटरस्पोर्ट्सच्या दीर्घकालीन विकासासाठीही आम्ही हातभार लावू,” असे पुनित बालन यांनी म्हटले आहे.

आयएसआरएलचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे यांनी पुनित बालन ग्रुपच्या प्रवेशाचे स्वागत केले. विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंच्या विकासासाठी पुनित बालन यांची वचनबद्धता आणि जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याची त्यांची दूरदृष्टी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा विस्तार सुरू आहे. पीबीजी रेसिंगचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवरील क्रीडा उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवणारा असल्याचेही सांगण्यात आले.

आयएसआरएलचा तिसरा हंगाम अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी रोमांचक करण्याच्या दृष्टीने लीगकडून तयारी सुरू असून, उच्चस्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा मेळ साधण्यावर भर दिला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोणावळा येथील INS शिवाजी येथे ‘ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026’ ची सांगता

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाने विजेतेपदाचा करंडक जिंकून पटकावले...

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार...

‘लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख महिला वगळल्या

मुंबई-राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठ्या प्रमाणावर...