महापालिकेतील’स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग’ बंद झाल्यामुळे गँग बिथरली: राज ठाकरेंच्या ‘टीकेवर’वर मुंबई भाजपचा पलटवार

Date:

व्हिडिओ ट्विट करत विचारला ‘घरात बसणारे अन् लग्नात नाचणारे कोण?’ असा सवाल

मुंबई, दिनांक ९ जुलै २०२६
मुंबईतील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुंबई भाजपने व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मुंबई संकटात असताना स्वतः गायब राहणारे आणि अमीर खानच्या लग्नात नाचणारे कोण, अन् रस्त्यावर उतरून सेवा करणारे कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत भाजपने राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. मनसे कामगार सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ‘विकासाच्या नावाखाली सगळ्या शहरांचा विचक झालाय’ आणि ‘भावनाशून्य, दुर्घटनेवर आमदार हसतात’ अशी टीका केली होती, त्याला मुंबई भाजपने डिजिटल माध्यमाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.मुंबई भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. “मुंबईत नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस आलाय… पण लक्षात ठेवा, यावेळी मुंबईत मुंबईकरांना वाऱ्यावर सोडणारं ‘उबाठा’चं घरबसं सरकार नाही, तर जनतेची काळजी घेणारं भाजपचं खंबीर सरकार आहे,” असा टोला भाजपने उद्धव ठाकरेंना लगावला. महापालिकेतील ‘स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग’ बंद झाल्यामुळेच सध्या ठाकरेंची गँग बिथरल्याचा घणाघातही या निवेदनात करण्यात आला आहे.मुंबई भाजपने आपल्या प्रत्युत्तरात राज ठाकरे यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. “जेव्हा जेव्हा मुंबई संकटात असते, तेव्हा भाजपचे नेते स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून मुंबईकरांच्या मदतीला धावतात. पण दुसरीकडे, स्वतःला मुंबईचे तारणहार म्हणवणारे राज ठाकरे मात्र संकटकाळात थेट अमीर खानच्या लग्नात हजेरी लावतात, तिथे नाचतात आणि एन्जॉय करतात!” अशी टीका केली. स्वतः ऐन संकटसमयी गायब राहायचे आणि रात्रंदिवस काम करणाऱ्या भाजप नेत्यांवर टीका करायची, हा कुठला न्याय? असा सवालही उपस्थित केला आहे.

याच व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई भाजपने सध्या सुरू असलेल्या ‘राम रक्षा’ आंदोलनावरही अत्यंत गंभीर आणि तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘राम रक्षा’च्या नावाने आंदोलन करणारे एका वेगळ्याच पातळीचे ढोंगी आणि मूर्ख आहेत, अशी बोचरी टीका केली आहे. “जनतेच्या प्रश्नांशी या आंदोलकांना काहीही देणंघेणं नाही, फक्त प्रसिद्धीसाठी चाललेली ही केवळ स्टंटबाजी आहे. मुंबईकर अशा संधीसाधू, ढोंगी आणि स्वतःला स्वयंभू समजणाऱ्या नेत्यांना आता चांगलंच ओळखून आहेत,” असे म्हणत भाजपने विरोधकांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

व्हिडिओच्या शेवटी मुंबई भाजपने ठाकरे बंधूंना थेट इशारा देत म्हटले आहे की, “तुमची ही राजकीय नौटंकी आता तरी थांबवा! कारण संकटकाळात घरात बसणारे आणि लग्नात नाचणारे कोण, अन् रस्त्यावर उतरून सेवा करणारे कोण… हा फरक आता मुंबईकरांसमोर स्पष्ट झाला आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन

मुंबई, ९ जुलै:महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या...

डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

पुणे-गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः पावसाचा सर्वाधिक...

महिलांच्या सुरक्षेसाठी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे गरजेचे; लाचखोर अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा मुंबई.दि.९: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात...

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर...