ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान

Date:

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम; महापौर मंजूषा नागपुरे यांच्याहस्ते वारकऱ्यांचा सन्मान

-30 फूट विठ्ठल मूर्तीने वेधले लक्ष

पुणे  : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दाखल झालेल्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ सेवेकरी, भजन-कीर्तन, संगीत, सामाजिक आणि संतसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वारकऱ्यांचा ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मान करण्यात आला. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यंदाच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून सौ. सुलभा विजयकुमार दिवाण (भजनी गायिका), ह.भ.प. पांडुरंग दत्तात्रय गुजाका (भजनी गायक), ह.भ.प. हर्षल एकनाथ जाधव (मृदुंगमनी, संगीत विशारद), श्रीमती कांता साहेबराव लांडगे (भजनी गायिका), गणेश केशव गायकवाड (दत्त सेवक), श्रीमती शांताबाई पाटलोजी ढोरे (भजनी गायिका) आणि ह.भ.प. बाबासाहेब दत्तात्रय रानवडे (भजनी मंडळ) यांचा सन्मान करण्यात आला.

बोपोडी मेट्रो स्टेशनजवळील पालखी विसावा स्थळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर तथा समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक सनी निम्हण, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सपना छाजेड, रिपाइं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, रोटरी क्लब ऑफ पुना डाउनटाउन आणि संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत मालिश व फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शेकडो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

कार्यक्रमादरम्यान स्थानिक भजनी मंडळांनी अभंग, भजन आणि कीर्तन सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्वर जाविर यांनी केले. समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या 30 फुटी विठ्ठल मूर्ती आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती असलेल्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...